Raj Kundra Case Update | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाकडून 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेवर आज (23 जुलै) कोर्टाचा पुढील निर्णय आला आहे. राज कुंद्रा यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. वास्तविक कोर्टाने राज यांची पोलीस कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.

Raj Kundra Case Update | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, न्यायालयाकडून 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
रायन आणि राज
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 2:16 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेवर आज (23 जुलै) कोर्टाचा पुढील निर्णय आला आहे. राज कुंद्रा यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. वास्तविक कोर्टाने राज यांची पोलीस कोठडी 27 जुलैपर्यंत वाढवली आहे. अश्लील चित्रपटांद्वारे मिळवलेले पैसे ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टाला केला आहे. या कारणास्तव, राज कुंद्राचे येस बँकेच्या खात्याची आणि युनायटेड बँक खात्याची चौकशी झाली पाहिजे, असेही म्हटले आहे.

अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी (19 जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर 23 जुलैपर्यंत कोर्टाने राज यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. राजसोबत त्याचा साथीदार रायन थोरोपे हा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.

राज कुंद्राच्या घरावर छापा

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही.

राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

शिल्पाला समन्स बजावले जाणार नाहीत

राजच्या अटकेनंतर असे वृत्त आले होते की, आता गुन्हे शाखा शिल्पाचीही चौकशी करू शकते. परंतु, अहवालानुसार शिल्पाला समन्स पाठवले जाणार नाहीत, कारण तिच्याविरूद्ध कोणताही पुरावा मिळालेला नाही. राजने देखील आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शिल्पाला त्याच्या कामाबद्दल माहिती नव्हते.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

(Raj Kundra Case Update Businessman Raj Kundra and Ryan Thorpe have been sent to police custody till 27th July)

हेही वाचा :

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.