Rajkummar Rao | स्त्री 2 चित्रपटाबद्दल अखेर राजकुमार राव याने केले मोठे भाष्य…
स्त्री 2 प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार असे असंख्य प्रश्न हे चाहत्यांच्या मनात होते.
मुंबई : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला होता. रेकॉर्डब्रेक कमाई करून सर्वांना आर्श्चयाचा धक्काच दिला होता. स्त्री चित्रपटातील राजकुमार राव यांच्या अभिनयाचे काैतुक सर्वत्र करण्यात आले. स्त्री 2 ची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहात आहेत. आता स्त्री 2 बद्दल स्वत: राजकुमार राव याने एक मोठे अपडेट आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केलीये. कारण लवकरच स्त्री 2 चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
स्त्री 2 प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार असे असंख्य प्रश्न हे चाहत्यांच्या मनात होते. कारण गेल्या काही दिवसांपासून स्त्री 2 चित्रपटाचे काहीच अपडेट चाहत्यांना मिळत नव्हते. शेवटी आता यावर राजकुमार राव याने काही महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.
स्त्री 2 मध्ये श्रद्धा कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरने देखील स्त्री 2 बद्दलचे महत्वाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर केले. इतकेच नाही तर श्रद्धा कपूरने एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. म्हणजेच काय तर लवकरच स्त्री 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
एका मुलाखती दरम्यान राजकुमार रावने सांगितले की, स्त्री 2 ची शूटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे. निर्माते या संदर्भात लवकरच निर्णय देखील घेतील. या चित्रपटाचा सिक्वेल यायलाच हवा. स्त्री 2 देखील धमाकेदार असणार आहे. यावेळी अजून जास्त चित्रपटाबद्दल माहिती सांगणे राजकुमार राव याने टाळले आहे. पण स्त्री 2 चाहत्यांच्या भेटीला येणार हे नक्कीच…