‘त्याला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका’, राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली राखी सावंत

आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शिल्पाचे नाव कुणीतरी खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले आहे.

‘त्याला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका’, राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली राखी सावंत
राखी सावंत
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 1:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. कोर्टाने राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शिल्पाचे नाव कुणीतरी खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने म्हटले आहे.

राज याच्या समर्थनार्थ व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, ‘मित्रांनो तुम्हाला असे वाटत नाही का की, शिल्पाजींनी बॉलिवूडमध्ये इतकी मेहनत केली आहे आणि कोणीतरी त्यांचे नाव उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना शांततेत चांगले आयुष्य जगू द्या. कुणीतरी त्यांच्या कुटुंबात हस्तक्षेप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. राज कुंद्राजी यांनी असे केले आहे यावर माझा विश्वास नाही.’

राज कुंद्राचे केले कौतुक

राखी पुढे म्हणाली की, ‘राज कुंद्रा एक आदरणीय व्यक्ती आहेत. ते आमच्या शिल्पा शेट्टींचे पती आहेत. ते एक उद्योगपती आहे आणि कोणीतरी शिल्पा शेट्टीच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिल्पा शेट्टी यांनी इंडस्ट्रीमध्ये किती कष्ट केले आहेत? त्यांना शांततेत जगू द्या. त्यांना लहान मुलं आहेत. आपण काही पैशासाठी चांगल्या कुटुंबाला ब्लॅकमेल करत आहात. राज कुंद्रा यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. ते एक चांगले व्यक्ती आहेत.’

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

(Rakhi Sawant supports Raj Kundra says Don’t try to discredit him)

हेही वाचा :

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.