Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आयुष्यात खूप मोठे वादळ आले आहे.

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 12:59 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंतच्या (Rakhi Sawant) आयुष्यात खूप मोठे वादळ आले आहे. राखी सावंतची सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. नुकताच सोशल मीडियावर राखी सावंतने तिच्या आईसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसत आहे. (Rakhi Sawant’s mother thanked Salman Khan)

या व्हिडीओमध्ये राखीची आई म्हणत आहे की, सलमान बेटा धन्यवाद, सोहेल बेटा धन्यवाद मी तुमची आभारी आहे. मी आता दवाखान्यातच आहे, मला आतापर्यंत चार कीमो चढवले आहेत अजून दोन चढवले जाणार आहेत त्यानंतर माझे ऑपरेशन होईल. सलमान आणि सोहेल बेटा तुम्ही अशीच प्रगती करत राहा, देव तुमच्यासोबत आहे. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत राखीच्या आजारी आईचीच्या वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या. राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे.

टीव्हीचा सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. मात्र, या मागील कारण कळताच चाहत्यांनी देखील राखीचे कौतुक केले. यावर्षी या कार्यक्रमाची विजेती रुबीना दिलैक ठरली, तर राहुल वैद्य दुसर्‍या क्रमांकावर आणि निक्की तांबोळी तिसर्‍या क्रमांकाचे विजेते ठरले.

संबंधित बातम्या : 

शहनाज गिलसोबतच्या लग्नाबाबत सिद्धार्थ शुक्लाचे मोठे भाष्य, म्हणाला….

Tandav : अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक; सैफच्याही अडचणी वाढल्या

Tiger 3 : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला फटका!

(Rakhi Sawant’s mother thanked Salman Khan)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.