AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा ‘रंगिला’ बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल

रामूची चर्चा आता त्याचा कोणता नवा चित्रपट येणार आहे यापेक्षा आता त्यानं काय वादग्रस्त बोललंय, ट्विट केलंय किंवा आणखी कुठली गोष्ट केलीय यावरुनच होते. (Ramu becomes 'Rangila' when he plays Jackie, video goes viral)

रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा 'रंगिला' बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 12:41 PM
Share

मुंबई : राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) म्हटलं की आपसुकच वाद हा शब्द आपल्या ध्यानात येतो. म्हणजे रामूची चर्चा आता त्याचा कोणता नवा चित्रपट येणार आहे यापेक्षा आता त्यानं काय वादग्रस्त बोललंय, ट्विट केलंय किंवा आणखी कुठली गोष्ट केलीय यावरुनच होते. आताही कारण वेगळं नाहीय. राम गोपाल वर्मानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि तोच व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय. विशेष म्हणजे ह्या व्हिडीओत तो नसल्याचा दावा रामूनं शपथेवर केलाय.

राम गोपाल वर्माचाच(ram gopal verma)हा व्हिडीओ असल्याचा शोध मात्र नेटीझन्सनं लावलाय. तुम्हीही हा व्हिडीओ स्वत: पहा आणि ठरवा की, ह्या व्हिडीओत रामू आहे की नाही? पण रामू असो किंवा नसो व्हिडीओ खास आहे यात शंका नाही.

का खास आहे व्हिडीओ?

51 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. तो खास आहे कारण त्यात रामू आहे. फक्त रामू आहे असं नाही तर रंगिलातलं गाणं रामूनं ऊर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांना कसं समजून सांगितलं असेल याचा अंदाज ह्या व्हिडीओतून येतो. ओय रामा ए क्या हुआ, क्यूँ ऐसे हमे तुम सताने लगे हे गाणं वाजतंय आणि त्यावर रामू आणि एक तरुणी डान्स करतायत. रंगिलात ह्याच गाण्यावर जॅकी जसा ऊर्मिलासोबत खट्याळपणा करतो तसाच रामू ह्या व्हिडीओत करताना दिसतोय. रेड ड्रेसमध्ये एक तरुणी आहे ती ऊर्मिलाचा रोल प्ले करतेय. आजूबाजूला काही जणांची गर्दी आहे. एखाद्या गाण्याची ही रिहर्सल वाटावी असं आहे.

पाहा व्हिडीओ

रामूचं काय म्हणनं आहे?

हा व्हिडीओ राम गोपाल वर्मानेच ट्विट केलाय. पण ह्या व्हिडीओत तो नसल्याचा त्याचा दावा आहे. नेटीझन्सच्या म्हणण्यानुसार रामूसोबत नाचणारी ती हिरोईन इनाया सुलतान आहे. पण रामूनं तेही खोटं असल्याचं म्हटलंय. त्यासाठी रामू म्हणतो, अमेरीकेचे अध्यक्ष बिडेनची शपथ. एवढच नाही तर त्या व्हिडीओत मी नाहीच असाच दावा रामून केलाय. त्यासाठी बालाजी, गणपती, येशू अशा सगळ्या देवांची शपथ रामूनं घेतलीय.

रामूवर प्रेम आणि फटके

राम गोपाल वर्मावर तुमचं प्रेम असो किंवा नसो पण तुम्ही त्याला नाकारु शकत नाही. कारण बॉलीवूडला बदलण्याचं काम रामूनं केलं. रंगिला, सत्यासारखे सिनेमे हे अजरामर आहेत. ए.आर.रहमान(A.R.Rahman) अनुराग कश्यप (anurag kashyap) ही मंडळी बॉलीवूडला मिळाली तिच मुळात रामूनं केलेल्या प्रयोगातून. कसदार सिनेमा रामूच्या नावावर आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ आणि त्यावरचं खास शब्दातलं ट्विट यावर वाद होतोय. पण त्याच्या ह्याच व्हिडीओवर आणि स्टाईलवर प्रेम करणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काही युजर्सनं मात्र त्याला ट्विटवर फटके लगावण्याचा प्रयत्न केलाय, ज्याचा अर्थातच रामूला काही फरक पडणार नाही. नेहमीप्रमाणे. एकानं लिहिलंय, हा माणूस अॅक्टींग कसा करुन घेत असेल, तो स्वत: किती वाईट अभिनेता आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी: महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया

Man Jhala Bajind : ‘प्यार के लिये सब कुछ’, भाऊ कदमांच्या तोंडून ऐका त्यांच्या बाजिंद प्रेमाची गोष्ट

Saira Banu Birthday : वयाच्या 16 व्या वर्षी दिलीप कुमार यांच्या प्रेमात, अखेरपर्यंत साथ, सायरा बानो यांचे खास किस्से

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.