Filmfare awards 2023 | ब्रह्मास्त्र चित्रपटाने मारले फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मैदान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाचा जलवा
मुंबईमध्ये आज फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडत आहे. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड कलाकारांचा जलवा हा बघायला मिळतोय. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये कलाकार पोहचले असून अनेक कलाकारांनी अवॉर्ड्स आपल्या नावावर देखील केले आहेत. या अवॉर्ड्समध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा चित्रपट ब्रह्मास्त्रचा जलवा हा फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये (Filmfare awards) बघायला मिळतोय. या चित्रपटाला आतापर्यंत दोन पेक्षाही अधिक अवॉर्ड्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर दुसरीकडे आलिया भट्ट हिचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट देखील बाजी मारताना दिसतोय. म्हणजे काय तर फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे वर्चस्व दिसत आहे. ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटामध्ये फक्त रणबीर कपूर हाच नाही तर आलिया भट्ट ही देखील मुख्य भूमिकेत होती. ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल सुरूवातीपासूनच चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये धमाका करताना रणबीर आणि आलियाचे चित्रपट (Movie) दिसत आहेत.
9 सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी केली. मात्र, दुसरीकडे ब्रह्मास्त्र चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन फेक असल्याच्या धक्कादायक आरोप हा कंगना राणावत हिने केला होता.
आता ब्रह्मास्त्र चित्रपट फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाजी मारताना दिसतोय. ब्रह्मास्त्र चित्रपटाला थेट वीएफएक्स अवॉर्ड्स देखील मिळाला आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्स देखील जिंकला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट होता. या चित्रपट तयार करण्यासाठी तब्बल 410 कोटींचा खर्च आला.
Congratulations!
The Filmfare Award for Best VFX goes to DNEG and Redefine for #BrahmastraPartOneShiva at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/d5ofwNPAJi
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र हा चित्रपट तयार करण्यासाठी अत्यंत मोठा कालावधी देखील लागलाय. ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शन हे अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटात फक्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हेच नाही तर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील महत्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपट तयार करण्यासाठी आठ वर्ष लागले होते.
ब्रह्मास्त्र हा एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट होता. ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सतत सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू होता. सुरूवातीला असे सांगितले जात होते की, ब्रह्मास्त्र चित्रपटाला बॉयकॉटचा ट्रेंडमुळे मोठे नुकसान होईल. मात्र, प्रत्यक्षात बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आल्यावर हे स्पष्ट झाले की, ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर बॉयकॉटचा ट्रेंडचा अजिबात फरक पडला नाही.