Ranbir Alia Wedding: आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतोय, “मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय..”

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सध्या बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम माध्यमांसमोर व्यक्त केलं. तर आलिया सोशल मीडियावरही रणबीरसोबतचे फोटो पोस्ट करते.

Ranbir Alia Wedding: आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतोय, मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय..
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 9:19 AM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सध्या बॉलिवूडमधील सर्वांधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी जाहीरपणे एकमेकांवरील प्रेम माध्यमांसमोर व्यक्त केलं. तर आलिया सोशल मीडियावरही रणबीरसोबतचे फोटो पोस्ट करते. गेल्या वर्षभरापासून आलिया-रणबीरच्या लग्नाच्या (Wedding) चर्चा आहेत. नुकताच या दोघांचा डिझायनर बीना कन्ननसोबतचा फोटो व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागल्या आहेत. आता यावर रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. आलियासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात जेव्हा या दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या. 2018 मध्ये ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ही जोडी एकत्र आली होती. या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. तब्बल पाच वर्षांपासून सुरू असलेलं शूटिंग त्यांनी नुकतंच वाराणसीमध्ये संपूर्ण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आलिया-रणबीरची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ची शूटिंग संपल्याने आता आलिया-रणबीर लग्नाची तयारी करतील, अशीही चर्चा आहे. सप्टेंबरमध्ये हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकेल, असं म्हटलं जातंय.

आलियाची पोस्ट-

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर याविषयी म्हणाला, “मला पिसाळलेल्या कुत्र्याने नाही चावलंय की मी माझ्या लग्नाची तारीख मीडियासमोर जाहीर करेन. पण मी आणि आलिया लवकरच लग्न करणार आहोत.” आलियासुद्धा एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी व्यक्त झाली होती. “माझ्या मनात मी कधीच रणबीरशी लग्न केलंय”, असं ती म्हणाली होती.

हेही वाचा:

जॅकी श्रॉफ यांच्या मनाची श्रीमंती; निधनाचं वृत्त समजताच घरगड्याच्या घरी सांत्वनाला पोहोचले

Video: “त्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुकीबाबतची पोस्ट चर्चेत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.