ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री, पुढे काय झाले पाहा….

ब्रह्मास्त्र चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी रणबीर कपूर थिएटर पोहचल्यावर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे यावेळी रणबीरसोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

ब्रह्मास्त्र चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना रणबीर कपूरची प्रत्यक्षात एन्ट्री, पुढे काय झाले पाहा....
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 9:29 AM

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाला चाहत्यांकडून प्रेम मिळतयं. इतकेच नाही तर चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करण्यास देखील सुरूवात केलीयं. ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्या दिवशी 36 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 42 कोटींची कमाई केलीयं. कोरोनानंतर बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नसताना आता रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरूवात केलीयं. हा चित्रपट थिएटरमध्ये 9 सप्टेंबरला प्रदर्शित झालायं. विशेष म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र चित्रपट बघण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी थेट थिएटर पोहचलायं. आता याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इथे पाहा आलिया भट्टने शेअर केलेला फोटो

Ranbir kapoor

ब्रह्मास्त्र सुरू असताना रणबीर थेट पोहचला थिएटरमध्ये

ब्रह्मास्त्र चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी रणबीर कपूर थिएटर पोहचल्यावर प्रेक्षकांचा आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे यावेळी रणबीरसोबत फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. रणबीर कपूरने कोणत्याच चाहत्याला नाराज न करता प्रत्येकासोबत फोटो घेतला. थिएटरमधील प्रेक्षकांसाठी हा एक मोठा सुखद धक्काच होता. रणबीरचे थिएटरमधील काही फोटो स्वत: आलिया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले.

हे सुद्धा वाचा

आलिया भट्टने सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

यादरम्यान रणबीर कपूर बोलताना म्हणाला की, ब्रह्मास्त्र या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते आहे. तसेच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून मला खरोखरच खूप जास्त आनंद होतोयं. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते. काही लोकांनी ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. मात्र, असे असूनही ब्रह्मास्त्र चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोयं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.