रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत; प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक करणार या बायोपिकचं दिग्दर्शन
अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) हा आगामी चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर (Veer Savarkar) यांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या बायोपिकचं शूटिंग जून महिन्यापासून सुरू होणार असून लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडणार आहे.
अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) हा आगामी चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर (Veer Savarkar) यांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या बायोपिकचं शूटिंग जून महिन्यापासून सुरू होणार असून लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडणार आहे. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. रणदीपने सोशल मीडियावर यासंदर्भातील फोटो पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली. ‘कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती है’ (काही कथा सांगितल्या जातात तर काही जगल्या जातात) असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपची निवड केली.
“भारतात असे फार कमी कलाकार आहेत, जे त्यांच्या प्रतिभेने पडद्यावर एक वेगळी छाप सोडू शकतात आणि रणदीप त्यापैकीच एक आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी माझ्या डोक्यात सर्वांत आधी रणदीपचाच विचार आला. वीर सावरकरांचं योगदान दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही,” असं संदीप म्हणाले. तर प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय चित्रपट असेल, अशी आशा आनंद पंडित यांनी व्यक्त केली.
रणदीपची पोस्ट-
View this post on Instagram
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “आपण ज्या कथांकडे दुर्लक्ष केलं होतं, ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. हा चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल विचार करायला भाग पाडेल. रिसर्च टीमसोबत आम्ही जवळपास वर्षभरापासून या विषयावर काम करत आहोत.”
“देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं. त्यांची कथा ही जगासमोर आणायलाच हवी. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल”, अशी भावना रणदीपने व्यक्त केली.
हेही वाचा: