बादशाह याच्या मुंबईतील लाईव्ह परफॉर्मचे तिकिट पाहून डोळे नक्कीच चक्रावतील, इतके लाख…

बाकी गोष्टींशी मला मुळातच काही देणे घेणे नाही. आता परत एकदा बादशाह हा चर्चेत आलाय.

बादशाह याच्या मुंबईतील लाईव्ह परफॉर्मचे तिकिट पाहून डोळे नक्कीच चक्रावतील, इतके लाख...
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 10:53 PM

मुंबई : रॅपर आणि गायक बादशाह याने काही दिवसांपूर्वीच एक मोठी घोषणा केली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नंबर एकचा रॅपर आणि गायक म्हणून आज बादशाहची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी बादशाह याने म्हटले होते की, माझ्या सक्सेसमुळे काही लोक स्वत:ला त्रास करून घेतात. मात्र, मी कधीच कोणाला त्रास देत नाही. याचे मी काहीच करू शकत नाही. मी नेहमीच माझ्या मनाचे ऐकले आहे. बाकी गोष्टींशी मला मुळातच काही देणे घेणे नाही. आता परत एकदा बादशाह हा चर्चेत आलाय. मुंबईमध्ये 24 डिसेंबरला बादशाहचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बादशाहच्या या लाईव्ह परफॉर्मन्सची तयारी जोरदार सुरू आहे. अनेकांना रॅपर आणि गायक बादशाह याचा परफॉर्म प्रत्यक्षात पाहण्याची प्रचंड इच्छा आहे. बादशाहचा कोणताही कार्यक्रम असो तिथे लोकांची गर्दी कायमच प्रचंड असते.

बाॅलिवूडनगरी मुंबईमध्ये बादशाहचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार म्हटल्यावर लोकांची प्रचंड गर्दी तर असणारच ना…परंतू या लाईव्ह परफॉर्मन्सचे तिकिट पाहून अनेकांचे डोळे चक्रावले आहेत. कारण 1000-2000 हजार रूपयांना याचे तिकिट नाहीये.

मुंबईमध्ये बादशाहचा लाईव्ह परफॉर्मन्स जर तुम्हाला बघायचा असेल तर तब्बल 6 लाख रूपये मोजावे लागणार आहेत. होय…तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे…बादशाहला लाईव्ह परफॉर्म करताना बघण्यासाठी तुम्हाला 6 लाख रूपये मोजावे लागणार आहेत.

अनेकजण या लाईव्ह परफॉर्मन्सचे तिकिट बुक करत असताना त्यांना मोठा धक्काच बसला आहे. आता बादशहाच्या मुंबईतील लाईव्ह परफॉर्मन्सच्या तिकिटाच्या दरावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स तयार केले जात आहेत. अनेकांनी म्हटले की, या कार्यक्रमाचे तिकिट पाहून मला चक्करच आली.

बादशाह त्याच्या इंडिया टूरवर असून पागल कॉन्सर्ट शनिवारी मुंबईमधील वरळी येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे जवळपास तिकिट बुक झाल्याचे देखील सांगितले जात आहे. या कॉन्सर्टचे सर्वात स्वस्त तिकीट हे 2,499 रूपये होते. परंतू यामधील सर्वच तिकिटे अगोदरच बूक झाली आहेत. 

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....