जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज The Kashmir Filesच्या मदतीला धावून येतात..

सध्या सिनेमागृह ते सोशल मीडिया.. सर्वत्र 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांना आणि न पाहिलेल्यांनाही त्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये नेमकं काय घडलं होतं, याबद्दलही लोक बोलू लागले आहेत. तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे प्रसंगही हळूहळू समोर येऊ लागले आहेत.

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज The Kashmir Filesच्या मदतीला धावून येतात..
अभिनेता चिन्मय मांडलेकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:16 AM

सध्या सिनेमागृह ते सोशल मीडिया.. सर्वत्र ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांना आणि न पाहिलेल्यांनाही त्यातील बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे. 1990 मध्ये काश्मीरमध्ये नेमकं काय घडलं होतं, याबद्दलही लोक बोलू लागले आहेत. तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे प्रसंगही हळूहळू समोर येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग व्हायरल होत आहे. ही पोस्ट खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी शेअर केली आहे. ‘हे खरंच घडलंय’ असं म्हणत त्यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्थानिकांकडून अडचण निर्माण झाल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) ‘पावनखिंड’मध्ये साकारलेली छत्रपती शिवाजी महाजारांची भूमिका कशा पद्धतीने त्यांच्या मदतीला धावून आली, याविषयीची ही पोस्ट आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

द काश्मीर फाईल्सच्या शूटिंगदरम्यान घडलेला खरा प्रसंग, असं या पोस्टचं शीर्षक आहे. ‘द काश्मीर फाईल्स या चित्रपटातील सुरुवातीचा सीन आठवतोय का? जेव्हा फारूख अहमद बिट्टा हा भारताच्या विरोधात घोषणाबाजी करत असतो. देहरादून या ठिकाणी हा सीन चित्रीत करण्यात आला होता. बिट्टाची भूमिका चिन्मय मांडलेकरने साकारली आणि त्याच्यासोबत असलेल्या दहशवाद्यांच्या भूमिकेत देहरादूनचे स्थानिक लोक आहेत. सुरुवातीला हे स्थानिक आनंदाने शूटिंगमध्ये सहभागी झाले. मात्र जेव्हा त्यांनी स्क्रिप्टमध्ये भारताविरोधातील घोषणाबाजी ऐकल्या, तेव्हा त्यांनी निर्मात्यांना शूटिंग थांबवण्यास सांगितलं. हा चित्रपट भारतविरोधी नाही हे दिग्दर्शकांना तिथल्या लोकांना समजावून सांगावं लागलं. त्याचप्रमाणे चिन्मयला त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला चित्रपट स्थानिकांना दाखवावा लागला. हे पाहून अखेर त्यांनी शूटिंगची परवानगी दिली. मात्र त्यासाठी त्यांची एक अट होती. शूटिंग संपल्यानंतर दिग्दर्शकांना आणि विशेषकरून चिन्मयला ‘भारत माता की जय’ अशी घोषणा द्यावी लागेल, अशी त्यांची ही अट होती.’

चिन्मयच्या भूमिकेचं कौतुक

‘पावनखिंड’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये दहशतवादी बिट्टा या दोन्ही टोकाच्या भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरनं अत्यंत सहज वाटाव्या अशा साकारल्या आहेत. एकीकडे पावनखिंडमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आदराने मान खाली झुकते, तर दुसरीकडे द काश्मीर फाईल्समध्ये क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या बिट्टाच्या भूमिकेत त्याला पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. या दोन्ही चित्रपटांमधील चिन्मयच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत आहे.

हेही वाचा:

पावनखिंडसाठी कौतुक तर द काश्मीर फाईल्ससाठी शिव्या; लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल चिन्मय मांडलेकरला काय वाटतंय?

‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.