AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!

अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. पण, दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या आपला चित्रपट पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ओमिक्रॉन संकटाच्या काळात ‘RRR’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

RRR Movie Release | ओमिक्रॉन-कोरोनाचं संकट तरीही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार ‘RRR’, निर्मात्यांचा मोठा निर्णय!
RRR
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 12:57 PM
Share

मुंबई : प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे जिम, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल अशी सर्व गर्दीची ठिकाणे बंद होती. अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले, परंतु पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि ओमिक्रॉनमुळे पुन्हा निर्बंध सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. पण, दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या आपला चित्रपट पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ओमिक्रॉन संकटाच्या काळात ‘RRR’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे अर्थात ओमिक्रॉनमुळे सर्व मॉल्स, जिम, थिएटर्स इत्यादी पुन्हा एकदा बंद होऊ लागले आहेत आणि रात्रीचा कर्फ्यू देखील सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सिनेमागृहाकडे वळणेही बंद केले आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘83’ बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही, ज्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘जर्सी’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, दिग्दर्शक राजामौलींचा चित्रपट RRR त्याच्या नियोजित शेड्यूल 7 जानेवारी 2022 रोजीच रिलीज होणार आहे.

नवीन वर्षाची सुरुवात RRR चित्रपटाने!

एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. यामध्ये दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील अनेक नामवंत स्टार्स एकत्र काम करताना दिसणार आहेत. अभिनेता रामचरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट RRR चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांना हे जाणून आनंद होईल की, RRR च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली नाही. यावेळी नवीन वर्षाची सुरुवात एसएस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने होणार आहे. परंतु, यावर कोरोनाचे सावट आहेच.

म्हणूनच आरआरआरची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार नाही!

राजामौली यांनी त्यांच्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की त्यांचा पीरियड ड्रामा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट असून, या चित्रपटाची रिलीज डेट संक्रांतीच्या दिवशी निश्चित करण्यात आली होती. याशिवाय हा सिनेमा जुलै 2020 मध्येच रिलीज होणार होता, पण कोरोना आणि प्रोडक्शन विलंबामुळे या सिनेमाच्या रिलीजला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहायचे असून, आता या चित्रपटासाठी ते कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे.

हे सुद्धा वाचा:

Yoga Poses : 2022 वर्षाची निरोगी सुरुवात करण्यासाठी नियमित ‘ही’ 5 योगासने करा!

ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 

Ratan Tata : टाटांच्या वाढदिनी केक, टाळ्याही वाजवल्या, पाठही थोपटली, पण हे सगळं करणारा तो तरुण कोण?

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.