Bunty Aur Babli 2 Teaser | 12 वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार सैफ अली खान-राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

2021चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर या चित्रपटात नवोदित कलाकार सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Bunty Aur Babli 2 Teaser | 12 वर्षांनी पुन्हा एकत्र झळकणार सैफ अली खान-राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
Bunty Aur Babli 2
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 3:34 PM

मुंबई : 2021चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर या चित्रपटात नवोदित कलाकार सिद्धांत चतुर्वेदी, शर्वरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी तब्बल 12 वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. दोघांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट झाली होती.

पाहा ‘बंटी और बबली 2’चा टीझर रिलीज

1.26 सेकंदाचा टीझर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्यापासून सुरू होतो. दोघेही त्यांच्या लूकला टचअप देत आहेत. राणी म्हणते सैफू आपण इतक्या वर्षांनी एकत्र काम करत आहोत. सैफ म्हणतो की, आपण 12 वर्षानंतर एकत्र आलो आहेत. मग, राणी म्हणते की, सैफ सोबत काम करणं तिने देखील खूप मिस केलं आहे.

सैफने राणीच्या लूकचे कौतुक केले आहे. मग सैफ-राणी शूट सुरू करायला निघाल्याबरोबर, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी फ्रेममधून बोलण्यासाठी मागून येतात, तेही शूटसाठी सज्ज झालेले असतात. सिद्धांत आणि शर्वरी सांगतात की, ते सुद्धा बंटी-बबली आहेत. राणी सांगते की, इथे फक्त एक बंटी आणि बबली जोडी आहे. मग दिग्दर्शक सांगतो की, आदित्य चोप्राने स्क्रिप्ट बदलली आहे. आता चित्रपटात दोन बंटी बबली आहेत. यानंतर, रागाने सैफ-राणी त्यांच्या स्वतःच्या मेकअप रूममध्ये जातात आणि पॅकअप करतात.

कोरोनामुळे पुढे ढकलले प्रदर्शन

टीझर खूप मजेदार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माता आदित्य चोप्रा आहेत. हा चित्रपट 19  नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे.

सैफ-राणीची सुपरहिट जोडी

अभिनेत सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्साहित आहेत. यापूर्वी या दोघांनी ‘हम तुम’, ‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा प्यार थोडा जादू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 2005 साली आलेला ‘बंटी और बबली’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये अभिषेक बच्चनने राणी मुखर्जीसोबत काम केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनचे आयटम साँग ‘कजरारे’ सुपर डुपर हिट ठरले होते. या चित्रपटात राणी आणि अभिषेक धूर्त चोर झाले होते आणि अमिताभ बच्चन पोलिस झाले होते. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शानदार होते.

हेही वाचा :

Happy Birthday Parineeti Chopra : प्रियंका चोप्रा आणि निक जोनाससोबत परिणीतीची धमाल, पाहा खास फोटो

Satyameva Jayate 2 : जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, लवकरच चित्रपट होणार रिलीज!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.