Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?

बॉलिवूड(Bollywood)चा दबंग खान म्हणजेच सलमान खान(Salman Khan)नं 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक महागड्या भेटवस्तूही मिळाल्या आहेत, याची एकूण किंमत तब्बल २० कोटी रुपये आहे.

Salman Khan Birthday Gifts : सलमान खानला त्याच्या वाढदिवशी मिळाल्या करोडोंच्या भेटवस्तू, सर्वात महागडं गिफ्ट कोणी दिलं?
Salman Khan
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:18 PM

मुंबई : बॉलिवूड(Bollywood)चा दबंग खान म्हणजेच सलमान खान(Salman Khan)नं 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा केला. सलमानचा वाढदिवस त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर साजरा करण्यात आला, त्याच्या कुटुंबातले सर्वजण आणि काही जवळचे मित्र वाढदिवसाच्या पार्टीला आले होते. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांसह सलमानच्या लाखो चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर दबंग खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक महागड्या भेटवस्तूही मिळाल्या आहेत, याची एकूण किंमत तब्बल २० कोटी रुपये आहे. सलमान खानला त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांकडून या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

कॅटरिनानं काय दिलं? ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफ (सलमान खानची जवळची मैत्रीण आहे. कॅटरिना सलमानच्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहू शकली नाही, पण तिनं तिच्या आवडत्या को-स्टार आणि मित्राला खूप महागडं गिफ्ट दिलंय. कॅटरिनानं सलमानला सोन्याचं ब्रेसलेट दिलंय. याची किंमत सुमारे 2 ते 3 लाख रुपये आहे. त्याचबरोबर जॅकलिननं सलमानला चोपर्ड ब्रँडचं घड्याळ दिलंय, याची किंमत सुमारे 10 ते 12 लाख रुपये आहे.

संजय दत्तनं दिलं हिऱ्याचं ब्रेसलेट सलमानचा सर्वात खास मित्र आणि अभिनेता संजय दत्तनं त्याला हिऱ्याचं ब्रेसलेट दिलंय. याची किंमत लाखो आहे. त्याचवेळी अनिल कपूरनं सलमानला खूप महागडं लेदर जॅकेट दिलंय. या जॅकेटची किंमत 27 ते 29 लाख असल्याचं सांगण्यात येतंय. शिल्पा शेट्टीनं तिचा मित्र सलमान खानला सोन्याचं आणि हिऱ्याचं ब्रेसलेट दिलंय. याची किंमत 16 ते 17 लाख रुपये आहे.

कुणी कोटींची गाडी दिली, तर कुणी अपार्टमेंट दिली सलमान खानला मित्रांकडून काय मिळालं, ते आम्ही तुम्हाला सांगितलं, पण सलमानला त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांकडूनही खूप महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानची बहीण अर्पितानं त्याला रोलेक्स घड्याळ दिलंय, याची किंमत 15 ते 17 लाख रुपये आहे. अर्पिताचा पती आणि अभिनेता आयुष शर्मानं सलमानला सोन्याची साखळी भेट दिलीय, त्याची किंमत सुमारे 75 हजार रुपये आहे.

भावांकडूनही मिळालं मोठं गिफ्ट सलमानच्या दोन्ही भावांनी म्हणजे सोहेल खान आणि अरबाज खान यांनी त्याला BMW S 1000 RR आणि Audi RS Q8 दिली आहे. BMWची किंमत 23 ते 28 लाख रुपये आहे. त्याचवेळी ऑडीची किंमत 2 ते 3 कोटी आहे. बीएमडब्ल्यू सोहेलनं आणि ऑडी अरबाजनं सलमानला गिफ्ट केलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला त्याचे वडील सलीम खान यांच्याकडून सर्वात महागडं गिफ्ट मिळालं आहे. सलीम खान यांनी आपल्या लाडक्या मुलाला मुंबईतल्या जुहू इथं एक अपार्टमेंट गिफ्ट केलंय, या अपार्टमेंटची किंमत 12 ते 13 कोटी आहे.

Irrfan Khan यांच्या मृत्यूनंतर रिलीज होणार त्यांचा अखेरचा चित्रपट, पुन्हा अनुभवायला मिळणार अभिनय

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला सोडचिठ्ठी देणार जेठालाल उर्फ दिलीप जोशी?

Minnal Murali Movie Review: जबरदस्त स्टोरीटेलिंग, शानदार अभिनय, केरळमधल्या खेड्यातला देसी सुपरहिरो मार्वेल-डीसीपेक्षा वरचढ

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.