मलायका – अरबाजच्या मुलाकडे सलमान खानने फिरवली पाठ? मोठी माहिती समोर

अनेकांसाठी धावत जाणाऱ्या सलमान खान याने भावाच्या मुलाकडे फिरवली पाठ? मलायका - अरबाज यांच्या मुलाबद्दल मोठी माहिती समोर... नक्की काय आहे सत्य? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खान कुटुंबाचीच चर्चा...

मलायका - अरबाजच्या मुलाकडे सलमान खानने फिरवली पाठ? मोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 1:45 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यमुळे मलायका अरोरा हिचे खान कुटुंबासोबत असलेलं नातं देखील संपलं आहे. पण देघांचा मुलगा आरहान खान वडील आणि खान कुटुंबासोबत राहातो. आता अरहान खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेता सलमान खान भावाच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार नाही अशी चर्चा रंगली आहे. यावर खुद्द अरबाज खान याने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून, सलमान खान भाचा अरहान खान आणि निर्वान खान यांच्यासोबत सिनेमा करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण यावर कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नाही. पण आता अरबाज खान याने मोठा खुलासा करत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अरबाज खान म्हणाला, ‘याबद्दल मला काहीही माहिती नाही. रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत असं मला वाटतं. अरहान सध्या त्याच्या भविष्याचा विचार करत आहे. तो अद्याप तरूण आहे. अरहान आता 22 वर्षांचा होणार आहे. अभिनयात त्याला रस आहे…’

हे सुद्धा वाचा

‘स्वतःचं लक्ष्य साध्य करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. नशिबाने साथ दिली तर तो नक्की यशस्वी होईल. अरहान त्याला जे करायचं आहे ते तो नक्की करेल… एवढा विश्वास मला माझ्या मुलावर आहे…’ असं देखील अरबाज म्हणाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अरहान सध्या परदेशात स्वतःचं शिक्षण पूर्ण करत आहे. अनेकादा मलायका आणि अरबाज मुलाला सोडण्यासाठी विमानतळापर्यंत आले. तिघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

अरहान, मलायका आणि अरबाज यांचा मुलगा आहे. मलायका – अरबाज यांचा घटस्फोट झाल्यानंतर अरबान याने खान कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. तर अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. अरबाज याच्या दुसऱ्या लग्नात अरहान देखील उपस्थित होता.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अरबाज आणि शुरा यांनी लग्न केलं. रिपोर्टनुसार, शुरा हिचं देखील अरबाज याच्यासोबत दुसरं लग्न आहे. एवढंच नाहीतर, शुरा हिला एक आठ वर्षांची मुलगी देखील आहे. शुराची लेक तिच्यासोबतच राहाते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.