VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral

सलमान खान (Salman Khan) जे काही करतो, ते हटके असतं. सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आलाय. तो पनवेल(Panvel)मध्ये ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) चालवताना व्हिडिओत दिसतोय.

VIDEO : Salman Khan चालवतोय ऑटोरिक्षा, पनवेलमधला व्हिडिओ Viral
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 7:44 PM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) जे काही करतो, ते हटके असतं. सलमान खानची इंडस्ट्रीतल्या सर्वात ग्राउंड स्टार्समध्ये गणना केली जाते. लोकांमध्ये जायला, मिळून-मिसळून राहायला त्याला आवडतं. त्याचे व्हिडिओही आपण पाहत असतो. आता भाईजानचा असाच एक व्हिडिओ समोर आलाय. यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

व्हिडिओ व्हायरल सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आलाय. तो पनवेल(Panvel)मध्ये ऑटोरिक्षा (Auto Rickshaw) चालवताना व्हिडिओत दिसतोय. 56व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलमध्ये आराम करत असलेल्या सलमान खानचा हा अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत. व्हिडिओमध्ये सलमान खान पनवेलच्या रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवताना दिसतोय. ऑटोमध्‍ये सलमान खान असल्याचं समजताच ते एक्सायटेड झाले आणि मोबाइल काढून व्हिडिओ बनवू लागले.

देखणा ऑटोरिक्षाचालक व्हिडिओमध्ये लोक सलमान खानच्या ऑटोरिक्षात बसलेले दिसत होते. आता सलमान जो ऑटोरिक्षा चालवत होता, त्यात बसलेले लोक त्याच्या ओळखीचे होते, की दुसरेच हे काही कळू शकलं नाही. व्हिडिओमध्ये दबंग खान कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला सलमान खाननं टोपीही घातली होती. इतका देखणा ऑटो रिक्षाचालक तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

वाढदिवसाचं सेलिब्रेशन सलमान खान गेल्या आठवड्यात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलला पोहोचला होता. वाढदिवसानंतरही सलमान खान पनवेलमध्ये कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवतोय. सलमान खानच्या वाढदिवसाआधी एक मोठा अपघातही झाला. दबंग खानला त्याच्याच पनवेल फार्म हाऊसमध्ये साप चावला होता. सलमान खानला तीनदा साप चावलाय. यानंतर भाईजानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सलमान खानला काही तास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बरं झाल्यानंतर, अभिनेत्यानं त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

Shweta Tiwari | श्वेता तिवारीच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून माजी पतीनेही केली कमेंट! पाहा काय म्हणाला…

Year Ender 2021 | अनुष्का शर्मा ते करीना कपूर, मनोरंजनविश्वातील कलाकारांच्या घरी यंदा झालं चिमुकल्यांचं आगमन!

Liger Teaser | विजय देवरकोंडा, अनन्या पांडेच्या ‘लायगर’ची पहिली झलक, लवकरच होणार मोठा धमाका!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.