AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | सिनेवर्कर्सच्या मदतीसाठी सलमान खान पुन्हा पुढे सरसावला, आर्थिक मदतीत उचलला खारीचा वाटा!

कोरोनामुळे अवघ्या विश्वाचं आणि अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. अशातच मनोरंजन विश्वातही काम थंडावले आहे. मात्र, यामुळे सिनेवर्कर्सच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा काळात सिनेमातील कामगारांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचे आश्वासन ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याने पाळले आहे.

Salman Khan | सिनेवर्कर्सच्या मदतीसाठी सलमान खान पुन्हा पुढे सरसावला, आर्थिक मदतीत उचलला खारीचा वाटा!
सलमान खान
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : कोरोनामुळे अवघ्या विश्वाचं आणि अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. अशातच मनोरंजन विश्वातही काम थंडावले आहे. मात्र, यामुळे सिनेवर्कर्सच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा काळात सिनेमातील कामगारांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचे आश्वासन ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याने पाळले आहे. वास्तविक, सलमान मागील लॉकडाऊनपासून गरजू लोकांना मदत करत आहे. आता सलमान पुन्हा सिने कामगारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्याने प्रत्येक कामगाराच्या खात्यात 1500 रुपये ट्रान्स्फर केले आहे (Salman Khan transfer money to Cine workers account for help).

सिनेवर्कर्सच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करून सलमान खानने आपले वचन पूर्ण केले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने वर्कर्सचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले, ‘सलमान खान हा एक असा बॉलिवूड अभिनेता आहे, जो आवश्यक असेल तेव्हा मदत करायला नेहमीच पुढे असतो.’

पहिल्या लॉकडाऊनमध्येही सलमानने सिनेसृष्टीतील कामगार सदस्यांना मदत केली होती आणि आम्ही त्यांचे नेहमी आभारी राहू, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यातही तो कामगारांना मदत करत राहणार असल्याचे तिवारी म्हणाले. गेल्या वर्षी सलमानने सर्व कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये ट्रान्स्फर केले होते.

इतर सेलेब्सही मदतीसाठी पुढे

सलमानशिवाय अनेक सेलेब्सही मदतीसाठी पुढे आले आहेत. गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूद याला ‘मसीहा’ म्हटले जाते. सोनूने आपले ‘इंडिया फाइट्स विथ कोविड’ नावाचे चॅनेल उघडले. या चॅनेलच्या माध्यमातून गरजू लोकांना रुग्णालये, औषधे आणि ऑक्सिजनची मदत दिली जाते.

प्रियंका चोप्रा

कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान ग्लोबल अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील मदतीसाठी पुढे सरसावली होती. तिने निकच्या सोशल मीडियावरील कोव्हिड 19 रिसोर्सशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी भारताच्या कोरोना संघर्षादरम्यान 100 ऑक्सिजन काँसंट्रेटर दान केले होते.

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने ‘रिपोर्ट हंगर- खाना चाहिये’ फाउंडेशन नावाचे एक व्यासपीठ तयार केले आहे. याद्वारे ती गरजू लोकांना अन्न व इतर वस्तू पुरवण्याचे काम करते.

सुष्मिता सेन

सुष्मिता सेन हिने दिल्लीतील रुग्णालयासाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली होती. सुरुवातीला तिला मुंबईहून दिल्लीला सिलिंडर पाठवण्यात अडचण आली होती आणि त्यासाठी तिने चाहत्यांची मदत घेतली होती. यानंतर तिने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते की, हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलिंडर मिळाले आहेत.

(Salman Khan transfer money to Cine workers account for help)

हेही वाचा :

Karan Mehra | अभिनेता करण मेहराच्या अडचणी वाढल्या, पत्नी निशाने दाखल केला दुसरा गुन्हा

बच्चन परिवाराची ‘बॉस लेडी’ जया बच्चन करणार डिजिटल विश्वात पदार्पण, ‘या’ वेब सीरीजमध्ये झळकणार!

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.