एकेकाळी संगीता बिजलानीशी लग्न करायला निघालेला सलमान खान, लग्नाच्या पत्रिका देखील छापलेल्या! वाचा पुढे काय झालं?

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचे (Salman Khan) वास्तविक आयुष्य नेहमीच खूप चर्चेत असते. बऱ्याच वर्षांपासून सलमान खान जेव्हाही कोणत्याही कार्यक्रमाला पोहचत असे, तेव्हा त्याला निश्चितपणे एक प्रश्न विचारला जायचा आणि तो म्हणजे, 'तू लग्न कधी करणार आहेस?'

एकेकाळी संगीता बिजलानीशी लग्न करायला निघालेला सलमान खान, लग्नाच्या पत्रिका देखील छापलेल्या! वाचा पुढे काय झालं?
Sangeeta -Salman
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 1:39 PM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचे (Salman Khan) वास्तविक आयुष्य नेहमीच खूप चर्चेत असते. बऱ्याच वर्षांपासून सलमान खान जेव्हाही कोणत्याही कार्यक्रमाला पोहचत असे, तेव्हा त्याला निश्चितपणे एक प्रश्न विचारला जायचा आणि तो म्हणजे, ‘तू लग्न कधी करणार आहेस?’ एका दशकात सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) यांच्यातील नाते संबंध वर्तमानपत्रांच्या हेडलाईन बनल्या होत्या आणि चर्चेत आले होते. अगदी दोघेही लग्न करण्याच्या मार्गावर होते. मात्र, नंतर अचानक संगीता बिजलानी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले आणि बॉलिवूडपासून अंतर बनवले.

एका मुलाखतीदरम्यान संगीताला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तिने सलमानसोबत इतक्या वर्षांमध्ये मैत्री कशी टिकवली? या प्रश्नावर ती म्हणाले की, ‘कनेक्शन कधीही तुटत नाहीत. तुमचा जोडीदार आणि शालेय मित्र यांच्यातील प्रेम कधीही कमी होत नाही. लोक येतात आणि जातात, येतील आणि जातील. माझ्या आयुष्यात एक वेळ आली, जेव्हा मी बालिश वागायचे. पण आता मी मोठी झाले आहे. कॉफी विथ करण या शोमध्येही सलमान खानने संगीताशी लग्न करण्याविषयी बोलले होते.’

दोस्ती की है…

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानबद्दल बोलताना ती म्हणाले की, ‘ज्यांना तुम्ही बऱ्याच काळापासून ओळखता त्यांच्याशी मैत्री करणे चांगले आहे. त्याचवेळी सलमानच्या ‘मैने प्यार किया’ या पहिल्या चित्रपटाचा एक संवाद बोलताना ती म्हणाला की, ‘दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी.’

लग्नाचे कार्ड छापले…

करण जोहरच्या शोमध्ये संगीताशी लग्न करण्याच्या चर्चेवर सलमान खान म्हणाला, ‘एक काळ होता जेव्हा मला खरोखरच तिच्याशी लग्न करायचे होते, पण दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. मी एक चांगला बॉयफ्रेंड आहे, पण माझ्यासाठी आयुष्यभर सहन करणे थोडे कठीण आहे. एवढेच नाही तर एक वेळ अशी आली होती जेव्हा आमच्या दोघांच्या लग्नाचे कार्ड छापले गेले होते.’ करण जोहरने सलमान खानला दुसरा प्रश्न विचारला की, ‘मग असे काय झाले की दोघांचे लग्न तुटले?’

सलमानने टाळला प्रश्न

सलमान खानने प्रश्न स्वीकारण्यापूर्वी तो टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, ‘तू कशाबद्दल बोलत आहेस? संगीता बिजलानीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 1987मध्ये आदित्य पांचोलीच्या सोबत ‘कातिल’ या चित्रपटातून केली होती. त्याचवेळी, सलमान शेवटच्या वेळी ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानीही झळकली होती.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | स्नेहा वाघची दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट, 11 वर्षांनी लहान डान्सरसोबत डेटिंगची चर्चा!

‘सैराट’च्या ‘लंगड्या’ची जगभरात धूम, आता मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगताना तानाजी गालगुंडे म्हणतोय…

Birthday Special : ‘हाथी मेरे साथी’ ते ‘जीने की राह तक’पर्यंत, तनुजाच्या कारकिर्दीतील ‘हे’ 5 सर्वोत्कृष्ट चित्रपट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.