Satish Kaushik | सलमान खान याच्यासाठी लक्की ठरले सतीश कौशिक, अभिनेत्याचे बुडते करिअर…
सतीश कौशिक यांचे आज निधन झाले आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सलमान खान याचे चित्रपट सतत फ्लाॅप जात असताना सतीश कौशिक यांचा चित्रपट सलमान खान याच्यासाठी लक्की ठरला.
मुंबई : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे आज निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे परवाच अत्यंत आनंदाने होळी खेळताना सतीश कौशिक हे दिसले होते. ज्याचे आता काही फोटो आणि व्हिडीओ (Video) पुढे येत आहेत. सतीश कौशिक याच्या निधनाची माहिती अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी शेअर केली. सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे सतीश कौशिक याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विनोदी भूमिका करत सतीश कौशिक यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे.
सतीश कौशिक यांचा तेरे नाम हा चित्रपट सलमान खान याच्यासाठी लक्की ठरला. तेरे नाम या चित्रपटाच्या अगोदर सलमान खान याचे अर्धा डजन चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. शेवटी तेरे नाम या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सलमान खान याच्या तेरे नाम चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवरील अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर नोंदवले.
सतीश कौशिक दिग्दर्शित तेरे नाम या चित्रपटाने पुन्हा एकदा सलमान खान याची कारकीर्द रुळावर आणली. सतत सलमान खान याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत होते. सतीश कौशिक यांचा तेरे नाम हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर सलमान खान याचे चित्रपट हिट ठरले.
अनुराग कश्यप आणि सलमान खान यांच्यामध्ये वाद हा तेरे नाम चित्रपटाच्या वेळीच झाल्याचे सांगितले जाते. तेरे नाम या चित्रपटानंतर सलमान खान आणि सतीश कौशिक यांच्यामध्ये एक खास रिलेशन तयार झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार सतीश कौशिक हे मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीत आले होते. रात्री उशिरा त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. पहाटे अडीचच्या सुमारास सतीश कौशिक यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. 1972 मध्ये त्यांनी दिल्लीच्या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि एफटीआयआयमध्येही शिक्षण घेतले. काही वर्षांपूर्वी सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण देखील झाली होती. कोरोनावर मात सतीश कौशिक यांनी केली.