धक्कादायक, 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांचा मृत्यू?; जिथे पार्टी झाली त्याच फार्म हाऊसच्या मालकाकडून घात?

सान्वी यांनी पती विकास यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी हा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे कौशिक प्रकरणात सान्वी जाणूनबुजून मेल पाठवत असल्याचं सांगितलं जात आहे.

धक्कादायक, 15 कोटींसाठी सतिश कौशिक यांचा मृत्यू?; जिथे पार्टी झाली त्याच फार्म हाऊसच्या मालकाकडून घात?
Satish KaushikImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 6:55 AM

नवी दिल्ली : अभिनेते सतिश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणाला नवं वळण लागताना दिसत आहे. कौशिक दिल्लीतील फॉर्म हाऊसवर होळीसाठी गेले होते. तिथे जंगी पार्टीही झाली होती. कुबेर ग्रुपचे विकास मालू हे या फार्म हाऊसचे मालक आहेत. विकास मालू यांच्या पत्नीनेच कौशिक यांच्या मृत्यूमागे आपल्या पतीचा हात असल्याचा दावा केला आहे. फार्म हाऊसच्या मालकाची पत्नी सान्वी मालू यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना चिठ्ठी लिहून हा आरोप केला आहे. त्यामुळे कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

सान्वी मालू यांनी या चिठ्ठीत अनेक धक्कादायक आरोप केले आहे. विकास आणि सतिश कौशिक यांचं 15 कोटीच्या व्यवहारावरून भांडण झालं होतं. विकास आणि कौशिक दोघे जुने दोस्त आहेत. विदेशात एकदा कौशिक विकासकडून आपले 15 कोटी रुपये घ्यायला आले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. नंतर पैसे देईल असं सांगून विकास यांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती, असं सान्वी यांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

चुकीचं औषध दिलं असावं

सान्वी यांनी कौशिक यांच्या मृत्यूमागे पतीचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. पैसे देण्याची नौबत येऊ नये म्हणून विकासने कौशिक यांना चुकीचे औषध दिले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अँगलची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सान्वी यांनी केली आहे.

विकासवर रेपचा गुन्हा

दरम्यान, सान्वी यांनी पती विकास यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी हा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे कौशिक प्रकरणात सान्वी जाणूनबुजून मेल पाठवत असल्याचं सांगितलं जात आहे. विकास या प्रकरणात अडकावा यासाठी सान्वीचा प्रयत्न असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सतिश कौशिक यांच्या कुटुंबीयांनीही कौशिक यांच्या मृत्यूवर कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळे सान्वी यांनी आपल्याच पतीवर आरोप केल्याने अनेकतर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कौशिक यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झाल्याचं उघड झालं आहे.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.