‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?

२१ वर्षीय मेघनाने फेसबुकवर घडलेला प्रकार सांगितला. भाचीची ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत शबाना (Shabana Azmi) यांनी संताप व्यक्त केला.

'ओला'ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?
Shabana AzmiImage Credit source: Instagram/ Shabana Azmi
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 11:36 AM

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमींच्या (Shabana Azmi) भाचीला मुंबईत ‘ओला’द्वारे (Ola) प्रवास करताना अत्यंत वाईट अनुभव आला. शबाना यांची २१ वर्षीय भाची मेघना हिने सोशल मीडियावर तिला आलेला अनुभव लिहिला. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, कॅब चालकाने तिला रात्री उशिरा मधेच रस्त्यात उतरण्यास सांगितलं. यामुळे तिला दादरच्या (Dadar) पुलावर बराच वेळ दुसऱ्या टॅक्सीसाठी वाट पहावी लागली. भाचीची ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत शबाना यांनी घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. ‘ओलाने प्रवास करताना माझ्या भाचीला हा भयानक अनुभव आला. हे अत्यंत अस्वीकार्य आहे’, असं शबाना यांनी ट्विटरवर लिहिलं. या पोस्टनंतर ओला कंपनीने त्यांची माफी मागितली आहे.

मेघनाची फेसबुक पोस्ट- मेघनाने तिच्या फेसबुक पेजवर लिहिलं, ‘लोअर परेल ते अंधेरी पश्चिमला जाण्यासाठी मी ओला बुक केली होती. कॅब ड्रायव्हरने माझी राइड स्वीकारली आणि तो मला पिकअप करायला आला. राईड सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनंतर त्याला जाणवलं की पुढे खूप ट्रॅफिक आहे आणि घरी पोहोचायला त्याला उशीर होईल. म्हणून त्याने मला दादर पुलावर मध्यभागी उतरायला लावलं. रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे दुसरी टॅक्सी शोधणं कठीण झालं होतं. मला पुलावरून उतरून दादर मार्केटमधून चालत जावं लागलं. तिथून पुढे मला दोन तास लागले. ओला कॅब चालकाचं नाव मुस्तकीन खान आहे. कृपया मदत करा, हे अस्वीकार्य आहे.’

ओलाने मेघनाच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत प्रतिसाद दिला. ‘आम्ही समजू शकतो की हे तुम्हाला अत्यंत वाईट अनुभव आला असेल. असा अनुभव तुम्हाला यावा अशी आमची कधीच इच्छा नव्हती. कृपया तुमच्या प्रवासचा CRN आम्हाला इनबॉक्सद्वारे शेअर करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर मदत करू शकेल,’ असं त्यांनी लिहिलं. मात्र त्यानंतर तक्रारीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुढे काही संवाद झाला नाही.

संबंधित बातम्या: जेव्हा लग्न झालेल्या जावेद अख्तरच्या प्रेमात पडल्या शबाना आझमी, वाचा ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

संबंधित बातम्या: दिवसाकाठी 30 रुपयांसाठी पेट्रोल पंपवर कॉफी विकायच्या शबाना आझमी, वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी

संबंधित बातम्या: ऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.