पठाण चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर शाहरुख खान याने केले मोठे विधान, म्हणाला आता गावी…

पठाण चित्रपटाला जरी प्रेक्षकांचे प्रेम मिळत असले तरीही आरआरआर चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडण्यात पठाण चित्रपटाला यश मिळाले नाहीये.

पठाण चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर शाहरुख खान याने केले मोठे विधान, म्हणाला आता गावी...
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 5:30 PM

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करतोय. फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशामध्येही पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. पठाण चित्रपट इतर बाॅलिवूडच्या चित्रपटांसारखा फ्लाॅप जाईल, असे सुरूवातीला अनेकांना वाट होते. परंतू ओपनिंग धमाकेदार करत चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. पठाण हा शाहरुख खान याचा बहुचर्चित चित्रपट (Movie) आहे. कारण पठाण या चित्रपटाच्या माध्यमातूनच शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. पठाण या चित्रपटानंतर लगेचच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असल्याने टीका केली जात होती. मात्र, पठाण चित्रपटाला जरी प्रेक्षकांचे प्रेम मिळत असले तरीही आरआरआर चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडण्यात पठाण चित्रपटाला यश मिळाले नाहीये.

मुळात म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे जास्त प्रमोशन केले नाही. तो फक्त पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियावर होता.

पठाण चित्रपट रिलीज झाल्यापासून शाहरुख खान हा बिझी आहे. मात्र, असे असताना देखील त्याने शनिवारी Ask SRK सेशन घेतले. यामध्ये शाहरुख खान याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Ask SRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड पाहून तुम्हाला काय वाटत आहे? यावर अतिशय भन्नाट उत्तर शाहरुख खान याने दिले.

Pathaan

शाहरुख खान याने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले की, हा हा आता गावी परत जावंसं वाटतंय…दुसऱ्या चाहत्याने विचारले की, सर पठाण चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पाहून तुम्हाला कसे वाटत आहे?

यावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, भाऊ, फोन नंबरसोबत आम्ही आनंद शोधतो. आता शाहरुख खान याच्या याच उत्तरांची चर्चा रंगताना दिसत आहे. सध्या बाॅक्स ऑफिसवर शाहरुख खान याचा चित्रपट धमाल करत आहे.

चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर इतका मोठा वाद होऊनही चित्रपटाने धमाकेदार सुरूवात केलीये. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल आक्रमक झाले होते. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक वेगळीच हवा बघायला मिळाली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.