Pathaan Movie Controversy | पठाण चित्रपटाच्या वादावर शाहरुख खान याने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला चित्रपट हा…

फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच नाहीतर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

Pathaan Movie Controversy | पठाण चित्रपटाच्या वादावर शाहरुख खान याने अखेर दिली प्रतिक्रिया, म्हणाला चित्रपट हा...
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 7:45 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत असताना आज मीडियासमोर येत शाहरुख खान याने अनेक चर्चांवर स्पष्टीकरण दिले. पठाण चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यानंतर शाहरुख खान किंवा पठाण चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करताना अजिबात दिसली नाही. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. SRK सेशनमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, सर चार दिवसांपूर्वीच माझे लग्न झाले आहे. मग मी हनीमूनला जाऊ की, पठाण चित्रपट बघायला. यावर शाहरुख खान याने एकदम खास उत्तर देत म्हटले होते की, अगोदर तू पठाण चित्रपट बघायला जा आणि मग हनीमूनला जा…SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच नाहीतर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

मुळात म्हणजे पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद सुरू होता. देशामध्ये अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट शाहरुख खान याला जीवे मारण्याची धमकी दिली.

पठाण या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. सोशल मीडियावरही पठाण चित्रपटाच्या विरोधात एक वातावरण बघायला मिळत होते.

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद सुरू असतानाच शाहरुख खान किंवा पठाण चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने या वादावर काहीच भाष्य केले नव्हते. मात्र, आता यावर शाहरुख खान याने मोठे वक्तव्य केले आहे.

शाहरुख खान याने कोणाचेही नाव न घेता काही गोष्टी स्पष्ट केल्या. मात्र, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान याला मोठे टेन्शन होते हे स्वत: शाहरुख खान याने सांगितले आहे.

शाहरुख खान म्हणाला की, मी सत्तेत असलेल्या लोकांशी बोललो आणि चित्रपट सर्वत्र शांततेत प्रदर्शित होईल याची खात्री अगोदर केली. चित्रपट शांततेत रिलीज व्हावा, ही मला मोठी काळजी होती.

मुळात म्हणजे चित्रपट ही काही मोठी गोष्ट नाही, ती फक्त करमणूक आहे. सगळे सुरळीत व्हावे असे मला सुरूवातीपासूनच वाट होते आणि तसेच झाल्याने मोठा आनंद देखील झाला.

शाहरुख खान पुढे म्हणाला, मी प्रत्येक धर्मासाठी चित्रपट बनवतो. चित्रपट कोणत्याही भाषेतील असो…एकच कायमच ठरलेले असते की, आम्ही आमच्या पात्रामधून सर्वांचे मनोरंजन करू…कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.