Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, साऊथमध्ये जलवा दाखवण्यात शाहरुख खान अपयशी
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. इतकेच नाही तर पुण्यात बजरंग दलाने पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील काढले होते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत पर्दापण केले. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. धमाकेदार ओपनिंग करत पठाण चित्रपटाने जगभरातून तब्बल १०० कोटींचे बाॅक्स ऑफिस (Box office) कलेक्शन केले. पहिल्याच दिवशी देशामधून ५४ कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. या चित्रपटावर सतत बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात या वादाचा फायदा हा चित्रपटाला झाल्याचे दिसत आहे. चित्रपटाला रिलीज होऊन आता पंधरा दिसत होत असून अजूनही बाॅक्स ऑफिसवर पठाण चित्रपट (Movie) चांगली कामगिरी करतोय. पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. इतकेच नाही तर पुण्यात बजरंग दलाने पठाण चित्रपटाचे पोस्टर देखील काढले होते. तर मुंबईमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटर मालकांना नोटीस पाठवल्या होत्या.
हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले. मात्र, साऊथमध्ये शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा झाली नाही. पंधरा दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने एकूण साऊथमध्ये 16.20 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही पठाण चित्रपट रिलीज झाला.
#Pathaan continues its VICTORIOUS MARCH on weekdays… Will collect ₹ 91 cr [+/-] in *Week 2*, which is an EXTRAORDINARY number… [Week 2] Fri 13.50 cr, Sat 22.50 cr, Sun 27.50 cr, Mon 8.25 cr, Tue 7.50 cr, Wed 6.50 cr. Total: ₹ 436.75 cr. #Hindi. #India biz. pic.twitter.com/cQDFTH8Upr
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2023
साऊथमध्ये जरीही पठाण चित्रपटाला यश मिळाले नसले तरीही जगभरातून पठाण चित्रपटाने आतापर्यंत तब्बल ८७५ कोटीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. हिंदी भाषेमध्ये भारतामधून ४३६.७५ कोटींचे कलेक्शन पठाण चित्रपटाने केले आहे. साऊथमधून चित्रपटाचे कलेक्शन फार कमी झालंय.
विशेष बाब म्हणजे इतके दिवस होऊनही पठाण चित्रपटाची अजूनही बाॅक्स ऑफिसवर हवा बघायला मिळत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर काही खास प्रमोशन केले नव्हते. फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता.