Pathaan | पठाणसमोर शहजादाची हवा गुल, शाहरुख खान याच्या चित्रपटाची 25 व्या दिवशीही बंपर कमाई

या चित्रपटाची क्रेझही चाहत्यांमध्ये बघायला मिळत होती. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, या सर्व वादाचा फायदा हा चित्रपटालाच झाल्याचे दिसते.

Pathaan | पठाणसमोर शहजादाची हवा गुल, शाहरुख खान याच्या चित्रपटाची 25 व्या दिवशीही बंपर कमाई
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 3:02 PM

मुंबई : बाॅलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) चित्रपट रिलीज होऊन तब्बल 25 दिवस झाले आहेत. हा चित्रपट अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून गायब झाला. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. शेवटी चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत असे पुनरागमन केले. शाहरुख खान याने दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही. सुरूवातीपासूनच शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाची क्रेझही चाहत्यांमध्ये बघायला मिळत होती. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, या सर्व वादाचा फायदा हा चित्रपटालाच झाल्याचे दिसते.

17 फेब्रुवारी रोजी कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, यादरम्यान पठाण चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी झाल्याने शहजादा या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. रिलीजला 25 दिवस झाले असतानाही बाॅक्स आॅफिसवर अजूनही पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे.

पठाण चित्रपटाचा मोठा फटका हा शहजादा या चित्रपटाला बसला आहे. ओपनिंग डेलाही चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाहीये. पठाण चित्रपटाने रिलीजच्या 25 व्या दिवशी 3.25 कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. रविवारी देखील चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होऊ शकते.

पठाण चित्रपटाची आता भारतामधून बाॅक्स आॅफिसवरील एकून कमाई 493.60 कोटींवर गेली आहे. 500 कोटींचा आकडा काही दिवसांमध्ये पठाण चित्रपट पार करेल. साऊथमध्ये चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीये. शाहरुख खान याची जादू साऊथच्या प्रेक्षकांवर झाली नाहीये.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.