Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्या चित्रपटाचा जलवा, KGF 2 चे रेकाॅर्ड पठाण तोडणार? पाहा आकडेवारी
या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने हा चित्रपट फ्लाॅप गेला. त्यानंतर शाहरुख खान कोणत्याही दुसऱ्या चित्रपटामध्ये दिसला नाही. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. या चित्रपटाने १२ दिवसांमध्ये अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरला आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने हा चित्रपट फ्लाॅप गेला. त्यानंतर शाहरुख खान कोणत्याही दुसऱ्या चित्रपटामध्ये दिसला नाही. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी शाहरुख खान हा पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिले. इतकेच नाही तर विदेशातही या चित्रपटाची क्रेझ दिसली. पठाण चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त करत जगभरातून तब्बल १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर सतत पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. परंतू प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळाली.
#Pathaan is SUPER-STRONG on [second] Mon [weekday rates], especially after collecting a HUMONGOUS TOTAL till Weekend 2… Inches closer to #KGF2 #Hindi *lifetime biz*… [Week 2] Fri 13.50 cr, Sat 22.50 cr, Sun 27.50 cr, Mon 8.25 cr. Total: ₹ 422.75 cr. #Hindi. #India biz. pic.twitter.com/M9UinfXkLp
— taran adarsh (@taran_adarsh) February 7, 2023
पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर मोठी कमाई करताना दिसत आहे. इतकेच नाही तर अनेक रेकाॅर्ड पठाण चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत. हिंदी भाषेत एकूण कमाई पठाण चित्रपटाने ४२२.७५ कोटी आतापर्यंत केली आहे.
हिंदी भाषेत KGF 2 चित्रपटाने एकूण कमाई ४३४.७० कोटी केली होती. म्हणजेच KGF 2 चे रेकाॅर्ड पठाण चित्रपट आरामात तोडू शकतो. जरी पठाण चित्रपटाला रिलीज होऊन १३ दिवस झाले असतील तरीही अजूनही प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाचे क्रेझ बघायला मिळत आहे.
KGF 2 चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडण्यासाठी १२ कोटीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पठाण चित्रपटाला करावे लागणार आहे. याबाबतचे एक खास ट्विट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला हिंदी भाषेमधून तब्बल ५४ कोटीचे कलेक्शन केले होते.