Pathaan | शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण ठरला, KGF 2 चे रेकाॅर्ड

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सुरूवातीपासूनच पठाण या चित्रपटाची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

Pathaan | शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण ठरला, KGF 2 चे रेकाॅर्ड
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 2:29 PM

मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित पठाण (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला रिलीज होऊन फक्त पाच दिवस झाले आहेत. मात्र, चित्रपटाने धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केली आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. फक्त देशामध्येच नाहीतर विदेशात देखील चित्रपटाची मोठी धूम बघायला मिळत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने KGF २ चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडले आहे. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून तब्बल चार वर्ष दूर होता. चाहते शाहरुख खान याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. शेवटी शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. सुरूवातीपासूनच पठाण या चित्रपटाची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर अनेकांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांना ट्रोलिंग करण्यास सुरूवात केली. इतकेच नाहीतर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही सातत्याने केली जात होती.

बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. यादरम्यान अनेक आरोपही करण्यात आले. काही लोकांना चित्रपटाच्या नावावर देखील आक्षेप होता. मात्र, यावेळी शाहरुख खान याने या वादावर बोलणे टाळले.

चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते. परंतू प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाणचीच हवा निर्माण झाली. सुरूवातीला बजरंग दल आक्रमक झाल्याचे देखील दिसले होते.

नुकताच रविवारचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आले असून चित्रपटाला विकेंडचा फायदा झाल्याचे दिसत आहे. या चित्रपटाने रविवारी ६२ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पठाण हा चित्रपट आता शाहरुख खानचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

KGF 2 चित्रपटाचे एका आठवड्याचे कलेक्शन 5 दिवसात पठाण चित्रपटाने पार केले आहे. पठाण चित्रपटाची जादू फक्त देशातच नाहीतर परदेशात देखील आहे. जगभरातून पठाण चित्रपटाने ४२९ कोटींची कमाई केली आहे. पठाण चित्रपटाने आता नवा रेकाॅर्ड करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० बाॅलिवूड चित्रपटांमध्ये समावेश झालाय.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.