Video : शिल्पा शेट्टीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली दुखापतीला मी माझी ताकद…
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होते आहे. आपल्यापैकी अनेकजण दुखापत झाल्यावर दैनंदिन कामे करणे टाळतात. मात्र, शिल्पाने याच दुखापतीला आपली ताकद बनवले आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात जाणार आहे.
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केलायं. शिल्पाने या व्हिडीओसोबतच एक मोठी लांबलचक पोस्टही शेअर केलीयं. व्हिडीओमध्ये शिल्पाने लाल टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्राऊजर घातलेली दिसत आहे. विशेष म्हणजे शिल्पा व्हिडीओमध्ये (Video) अत्यंत आनंदी दिसतयं. शिल्पाने पोस्टमध्ये तिच्या आनंदाचे कारणही सांगितले आहे. शिल्पाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांकडून शिल्पा शेट्टीचे काैतुक केले जात आहे. या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट (Comment) करताना दिसत आहेत.
इथे पाहा शिल्पा शेट्टीने शेअर केलेला व्हिडीओ
View this post on Instagram
मी माझ्या दुखापतीला माझी ताकद बनवले…
शिल्पा शेट्टीने पोस्ट शेअर करताना लिहिले की, समस्या ही खरोखरच समस्या आहे की समस्येकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन ही खरी समस्या आहे?’ पुढे शिल्पा लिहिते की, आज सकाळी या विचाराने मला विचार करायला लावला… दुखापतीने मला माझ्या दिवसाचा आनंद घेण्यापासून का रोखावे? आणि त्यामुळे या दुखापतीला मी माझी ताकद बनवायचे ठरवले आहे. आज योगाच्या क्लासमध्ये अतिशय साध्या आणि सोप्या आसनांचा समावेश केला… असे शिल्पाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होते आहे. आपल्यापैकी अनेकजण दुखापत झाल्यावर दैनंदिन कामे करणे टाळतात. मात्र, शिल्पाने याच दुखापतीला आपली ताकद बनवले आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात जाणार आहे. शोचे निर्माते आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, अजून शिल्पा शेट्टीने यासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाहीयं. यापूर्वी बिग बाॅसच्या घरात शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी गेली होती.