Shilpa Shetty | शिल्पा शेट्टी हिची आई रुग्णालयामध्ये दाखल, अभिनेत्रीने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाली
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शिल्पा कायमच शेअर करते. शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही कायमच चर्चेत असते. शिल्पा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टी याच्या एका वेब सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपले व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करते. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी हिच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, दुखापत झालेली असताना देखील शिल्पा शेट्टी ही व्यायाम करताना दिसली. यावेळी चाहत्यांनी शिल्पा शेट्टी हिचे काैतुक करत अनेक पोस्ट या सोशल मीडियावर (Social media) शेअर केल्या.
नुकताच शिल्पा शेट्टी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये शिल्पा हिने एक फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये शिल्पा शेट्टी हिची आई आणि डाॅक्टर दिसत आहेत. या फोटोसोबत शिल्पा शेट्टी हिने अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. आता शिल्पा शेट्टी हिच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
शिल्पा शेट्टी हिच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, नुकताच तिच्या आईची सर्जरी झालीये आणि तिची आई अजूनही रुग्णालयामध्ये आहे. शिल्पा शेट्टी हिच्या या पोस्टवर तिची बहीण शमिता शेट्टी हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पा शेट्टीची ही पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी हिने पोस्टमध्ये लिहिले की, कोणत्याही लेकरांसाठी आई वडिलांवर शस्त्रक्रिया होताना पाहणे कधीही सोपे नसते. माझ्या आईकडून मला काही शिकायचे असेल तर ते तिचे धैर्य आणि तिची लढाऊ भावना. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. माझा हिरो आणि माझ्या हिरोच्या हिरोला सगळं बरोबर मिळाले.
पुढे शिल्पा म्हणाली, शस्त्रक्रियेच्या अगोदर आणि नंतर माझ्या आईची इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉ राजीव भागवत यांचे खूप खूप आभार मानते… डॉक्टर आणि कर्मचारी यांचे खूप खूप आभार….नानावटी रुग्णालय आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार…आता शिल्पा शेट्टी हिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी ही तिच्या पतीमुळे चर्चेत आली होती. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याचे नाव पॉर्नोग्राफी प्रकरणात आले आहे. यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.