Video : श्रद्धा कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन थेट मालदीवमध्ये, पाहा खास व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आपला वाढदिवस मालदीवमध्ये साजरी करत आहेत.

Video : श्रद्धा कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन थेट मालदीवमध्ये, पाहा खास व्हिडीओ
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 11:43 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आपला वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करत आहेत. श्रद्धा कपूरच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये श्रद्धा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. श्रद्धा कपूरने नुकताच मालदीवमधील तिचा एक धमाकेदार व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्या ती स्लो मोशनमध्ये डान्स करताना दिसत होती. (Shraddha Kapoor’s birthday celebration in Maldives)

सध्या श्रद्धा कुटुंबियांसह आणि मित्रांसह मालदीवमध्ये आहे.  या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर ‘स्त्री’ या चित्रपटातील ‘कमरिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर भयानी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 3 मार्च 1987 रोजी मुंबईत जन्मलेल्या श्रद्धा कपूरने 11 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आर माधवन यांचा चित्रपट तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. परंतू श्रद्धाच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. या नंतर श्रद्धा कपूरने ‘स्त्री’, ‘एक विल्लन’, ‘हैदर’, ‘साहो’ यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक आणि चित्रपट निर्माता करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी यांचे लग्न आहे. यासाठी ती सध्या मालदीवमध्ये आहे.

श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 2020 मध्ये रिलीज झालेल्या ‘बागी 3’ चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान होते. श्रद्धा कपूर आता लव रंजन या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

शेतकरी आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा? किसान आंदोलनावर बनणार चित्रपट

सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या ‘तडप’ चित्रपटाचे पोस्टर शेअर, अक्षय कुमार म्हणतो…

अजय देवगणची गाडी रोखणाऱ्या तरुणाला जामीन, काय आहे प्रकरण

(Shraddha Kapoor’s birthday celebration in Maldives)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.