“माझं रक्त खवळतं”; भाऊ अभिषेकबद्दल बोलताना असं का म्हणाली श्वेता बच्चन?

गेल्या 20 वर्षांपासून हे सुरू; श्वेता बच्चनने व्यक्त केला राग

माझं रक्त खवळतं; भाऊ अभिषेकबद्दल बोलताना असं का म्हणाली श्वेता बच्चन?
Shweta and Abhishek BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 12:30 PM

मुंबई- सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सर्वाधिक फटका हा सेलिब्रिटींना बसतो. याच ट्रोलिंगवर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चनने (Shweta Bachchan) भाष्य केलं आहे. नेटकरी जेव्हा भाऊ अभिषेक बच्चनवर (Abhishek Bachchan) निशाणा साधतात, तेव्हा सर्वाधिक वाईट वाटत असल्याचं तिने म्हटलंय. श्वेताने तिच्याच मुलीच्या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट शोच्या नव्या एपिसोडमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अभिषेकची तुलना वडील अमिताभ बच्चन यांच्याशी करणं योग्य नसल्याचं यावेळी श्वेताने बोलून दाखवलं.

“युजर्स नेहमीच अभिषेकवर निशाणा साधतात आणि कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला ते पाहून खूप वाईट वाटतं. माझं रक्त अक्षरश: खवळतं. तुम्हाला जी गोष्ट पटत नाही, त्याची मला अजिताब पर्वा नाही. पण जेव्हा त्याला ट्रोल करतात, तेव्हा मला आवडत नाही. मी खरंतर त्याविषयी चर्चासुद्धा करू इच्छित नाही. कदाचित तो माझा लहान भाऊ आहे आणि त्याची मी अधिक काळजी घेते, म्हणून मला सर्वाधिक वाईट वाटत असेल”, असं श्वेता म्हणाली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

नेटकरी जेव्हा अमिताभ बच्चन यांना ट्रोल करतात, तेव्हा मात्र फार वाईट वाटत नसल्याचं श्वेताने स्पष्ट केलं. “नानांसाठी (अमिताभ बच्चन) मला फार वाईट वाटत नाही. पण अभिषेकसाठी मला फार वाईट वाटतं. कारण सतत त्याची तुलना अशा गोष्टीशी केली जाते, जी अतुलनीय आहे. एक अशी गोष्ट जी सर्वांपेक्षा खूप मोठी आणि अमूल्य आहे, त्याच्याशी तुम्ही अभिषेकची तुलना करताय. अशा गोष्टीला कोणीही टक्कर देऊ शकेल अशी अपेक्षाच तुम्ही कशी करू शकता? आयुष्यात तेच सर्वस्व नसतं. मला ते योग्य वाटत नाही”, असं श्वेता नव्याला म्हणाली.

गेल्या दोन दशकांपासून अभिषेक अशा ट्रोलिंगचा सामना करत असल्याचं श्वेताने म्हटलं. अभिषेकने 2000 मध्ये रेफ्युजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘दसवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या तो ‘ब्रीथ: इन्टू द शॅडोज’ या सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.