Palak Tiwari | स्टार किड्स संस्कृती उध्वस्त करतील, पलक तिवारी विरोधात संतापाची लाट, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याच्या चित्रपटातून पलक तिवारी ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र, यादरम्यान ती सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.

Palak Tiwari | स्टार किड्स संस्कृती उध्वस्त करतील, पलक तिवारी विरोधात संतापाची लाट, 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 8:01 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. पलक तिवारी ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. कायमच सोशल मीडियावर पलक तिवारी ही बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. अत्यंत कमी कालावधीमध्ये पलक तिवारी हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सलमान खान (Salman Khan) याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून श्वेता तिवारी हिची लेक पलक बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान याचा हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीलाय येतोय. खास ईदच्या दिवशी हा चित्रपट (Movie) रिलीज होणार आहे.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात फक्त पलक तिवारी हिच नाही तर बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच श्वेता तिवारी हिची लेक चर्चेत आलीये.

सध्या सोशल मीडियावर पलक तिवारी हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. पलक तिवारी हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. थ्रोबॅक व्हिडीओ पलक तिवारी हिचा व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओमुळे पलक तिवारी ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून अनेकांनी पलक तिवारी हिला खडेबोल सुनवण्यास सुरूवात केलीये.

व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून पलक तिवारी हिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तर सलमान खान यालाच प्रश्न विचारत म्हटले की, भाईजान तुम्ही अशा मुलीला चित्रपटामध्ये कसे घेऊ शकता? व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर युजर्स संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने आर्यन खान याच्याबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले होते.

पलक तिवारी हिच्या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, स्टार किड्स संस्कृती उध्वस्त करतील. दुसऱ्याने लिहिले की, आम्हाला तर विश्वासच बसत नाहीये की, ही चित्रपटामध्ये काम करत आहे. तिसऱ्याने लिहिले की, एकीकडे सलमान खान चित्रपटाच्या सेटवर फुल कपडे घालण्यास सांगतो आणि दुसरीकडे पाहा हिचा अंदाज. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे लोक पलक तिवारी हिला जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.