Sidharth Kiara Wedding | या कारणामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही विवाहसोहळा

इतकेच नाही तर लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींना देखील काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. असे सांगितले जात आहे की, मोजक्या लोकांमध्येच हा शाही विवाहसोहळा पार पडेल.

Sidharth Kiara Wedding | या कारणामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा शाही विवाहसोहळा
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 5:03 PM

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता शेवटी हे दोघे लग्नबंधणात अडकणार आहेत. सुरूवातीला चर्चा होती की, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघे ६ फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकणार आहेत. मात्र, ६ नव्हे तर ७ तारखेला यांचे लग्न पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वी कियारा अडवाणी ही मुंबईहून जैसलमेरकडे रवाना झाली तर सिद्धार्थ मल्होत्रा हा देखील दिल्लीहून जैसलमेरकडे रवाना झाला. सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांचे चाहते यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते. हे लग्न राजस्थान येथील जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार आहे. अत्यंत शाही पध्दतीने हे लग्न होणार आहे. इतकेच नाही तर लग्नामध्ये सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींना देखील काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. असे सांगितले जात आहे की, मोजक्या लोकांमध्येच हा शाही विवाहसोहळा पार पडेल.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला १५० पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले असून यामध्ये अनेक बाॅलिवूड कलाकारांचा समावेश आहे. या शाही विवाहसोहळ्यातील फोटो पाहण्यास चाहते आतुर आहेत.

सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नासाठी पाहुणे मंडळींची राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली असून ८४ रूम पाहुण्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आल्या आहेत. या सूर्यगढ पॅलेसचे एका दिवसाचे भाडे तब्बल २ ते ३ कोटी आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा संगीत आणि हळदीचा कार्यक्रम आज पार पडेल. या विवाह सोहळ्यासाठी नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी काल पोहचली आहे. ईशा आणि कियारा अडवाणी या लहानपणीपासूनच्या खास मैत्रिणी आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नानिमित्त सूर्यगढ पॅलेस बाहेर मोठी सुरक्षा दिसत आहे. कारण लग्नासाठी ईशा अंबानी देखील आलीये. यामुळे सुरक्षेची खास काळजी घेण्यात आलीये.

रिपोर्टनुसार सूर्यगढच्या आजूबाजूला शस्त्रांसह रक्षक तैनात आहेत आणि मोबाईल वापरण्याची परवानगी नाहीये. तीन सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत.

सूर्यगढ पॅलेसची सुरक्षा पाहून निमंत्रणाशिवाय कोणीही या पॅलेजमध्ये प्रवेश करू शकत नाही हे दिसून येत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी लग्नामध्ये नो फोन पाॅलिशी फाॅलो करण्यास सर्वांना अगोदरच सांगितले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.