हर हर महादेव! सोहा-कुणालच्या घरी महाशिवरात्रीची पूजा; चिमुकल्या इनायाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमू (Kunal Kemmu) यांच्या घरी महाशिवरात्रीनिमित्त पूजेचं आयोजन करण्यात आलं. सोहा आणि कुणालने सोशल मीडियावर या पूजेचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त देशभरात भगवान शंकराची पूजा केली जात आहे. महाशिवरात्री (Maha Shivratri) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यादिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमू (Kunal Kemmu) यांच्या घरी महाशिवरात्रीनिमित्त पूजेचं आयोजन करण्यात आलं. सोहा आणि कुणालने सोशल मीडियावर या पूजेचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सोहा-कुणालची मुलगी इनाया आणि कुणालचे कुटुंबीयसुद्धा या पुजेत सहभागी झाल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये चिमुकली इनाया (Inaaya) ही तिच्या वडिलांनी जेवण वाढताना दिसत आहे. इनायाच्या या फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. राजमा, भात, पालक पनीर, डाळ असे अनेक पदार्थ कुणालसमोर ठेवलेले आहेत. इनाया तिच्या वडिलांना राजमा वाढत असताना सोहाने तिचा फोटो क्लिक केला. हा फोटो पोस्ट करत सोहाने हेरथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवरात्रीच्या एक दिवस आधी सुरु होणारा हेरथ पर्व हा काश्मिरी हिंदू समाजातील महत्त्वपूर्ण सण आहे.
इनायाचे आणखी काही फोटो सोहाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं पहायला मिळत आहे. कुणालचा शंख वाजवतानाचा व्हिडीओसुद्धा तिने पोस्ट केला आहे. ‘हेरथ मुबारक. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. सर्वांना आनंद, शांती, प्रेम लाभो. ओम नम: शिवाय’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
View this post on Instagram
गेल्या महिन्यात सोहा आणि कुणालने लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. जुलै २०१४ मध्ये पॅरिसमध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर २५ जानेवारी २०१५ रोजी या दोघांनी मुंबईत लग्नगाठ बांधली. २९ सप्टेंबर २०१७ मध्ये सोहाने इनायाला जन्म दिला.
संबंधित बातम्या: मनोरंजन विश्वाला राम राम म्हणत कुटुंबात रमली सोहा अली खान
संबंधित बातम्या: बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सोहा अली खान करत होती ‘हे’ काम
संबंधित बातम्या: वडिलांच्या समाधीवर सोहा अली खानची लेकीसह प्रार्थना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल