AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha | या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिची एंट्री, अक्षय कुमार याच्यासोबत करणार धमाका

सोनाक्षी सिन्हा हिने अक्षय कुमार याच्या एका बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये आता एंट्री घेतलीये. अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची जोडी परत एकदा चित्रपटात पाहण्यास चाहते आतुर आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत.

Sonakshi Sinha | या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा हिची एंट्री, अक्षय कुमार याच्यासोबत करणार धमाका
| Updated on: Mar 03, 2023 | 5:18 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा हिने बाॅलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, काही दिवसांपूर्वी तिचा रिलीज झालेला चित्रपट डबल एक्सएल हा बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. फक्त सोनाक्षी सिन्हा हिचाच नाहीतर त्यादरम्यान कतरिना कैफ (Katrina Kaif) हिचा फोन भूत आणि जान्हवी कपूर हिचा मिली असे तीन चित्रपटसोबतच फ्लाॅप गेले. डबल एक्सएल चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा हिने तब्बल 15 ते 20 किलो वजन वाढवले होते. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

सोनाक्षी सिन्हा हिला एक मोठा बाॅलिवूड चित्रपट मिळाला असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अक्षय कुमार याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा ही स्क्रीन शेअर करणार आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी एकत्र काम केले आहे. परत एकदा या जोडीला सोबत पाहण्यास चाहते इच्छुक आणि आतुर आहेत.

रिपोर्टनुसार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा ही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सोनाक्षी सिन्हा हिने अक्षय कुमार याच्यासोबत काम केले आहे. मात्र, टायगर श्रॉफ याच्यासोबत सोनाक्षी पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. टायगर श्रॉफ हा या चित्रपटासाठी आपल्या बाॅडीवर काम करताना दिसत आहे.

अली अब्बास जफर यांचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट बिग बजेटचा असल्याचे सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा ही लवकरच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात करणार आहे. चित्रपटाचे मुंबईमधील शूटिंग जवळपास पूर्ण झाल्याचे सांगण्यात येतंय. पुढील शूटिंग दुबई येथे पार पडणार आहे.

सोनाक्षी सिन्हा हिच्या डबल एक्सएल या चित्रपटामध्ये हुमा कुरेशी देखील मुख्य भूमिकेत होती. सोनाक्षी आणि हुमा बाॅक्स आॅफिसवर धमाका करतील, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सोनाक्षीचा डबल एक्सएल हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जास्त वजन असलेल्या मुलींची स्टोरी दाखवण्यात आलीये.

विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांनी डबल एक्सएल या चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार केले होते. चित्रपटाच्या टीजरलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, चित्रपटा रिलीज झाल्यानंतर फ्लाॅप गेला. या चित्रपटाची स्टोरी देखील हटके होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.