Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soundarya | चार्टर्ड विमान कोसळून ‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याचाही गेलेला बळी, पेटलेल्या साडीने जीव वाचवण्याची धडपड ठरलेली व्यर्थ

विमान कोसळल्यानंतर सौंदर्या धावत बाहेर आल्या होत्या. तेव्हा त्यांची साडी पेटली होती. 'जीव वाचवा' म्हणून त्या गयावया करत होत्या, पण दुर्दैवाने त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही

Soundarya | चार्टर्ड विमान कोसळून 'सूर्यवंशम' फेम सौंदर्याचाही गेलेला बळी, पेटलेल्या साडीने जीव वाचवण्याची धडपड ठरलेली व्यर्थ
अभिनेत्री सौंदर्या
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 10:09 AM

मुंबई : देशाचे पहिले सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief Of Defense Staff) किंवा संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत (Gen Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर अपघातात (helicopter crash) निधन झालं. याआधीही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi), काँग्रेस नेते माधवराव शिंदे (Madhavrao Shinde), आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी (YSR Reddy) यांच्यासह अनेक दिग्गज नेते हवाई दुर्घटनांना बळी पडले आहेत. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या (Soundarya) यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता.

कोण होत्या सौंदर्या?

अभिनेत्री सौंदर्या यांची भूमिका असलेला सूर्यवंशम (Sooryavansham) सिनेमा माहित नाही, असा भारतात एकही चित्रपट रसिक नसेल. हिरा ठाकूरच्या प्रेमात पडलेल्या राधाची भूमिका त्यांनी साकारली होती. या सिनेमाची पारायणं अनेक जणांनी केली आहेत. त्यामुळे सौंदर्या यांच्या ‘सौंदर्य’, अदाकारी आणि अभिनयाच्या प्रेमात अनेक जण होते, किंबहुना आजही असतील.

नेमकं काय घडलं होतं?

चार्टर्ड विमानाच्या अपघातात सौंदर्या यांना प्राण गमवावे लागले होते. 17 एप्रिल 2004 चा तो दिवस. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सौंदर्या भाजप आणि तेलुगू देसम पक्षाच्या प्रचारासाठी बंगळुरुला चालल्या होत्या. 100 फूट उंचीवर गेलेलं त्यांचं चार्टर्ड विमान खराब हवामानामुळे कोसळलं आणि पेटलं.

साडी पेटली, जीव वाचवण्यासाठी आकांत

भयावह गोष्ट तर यापुढे आहे. प्रत्यक्षदर्शी सांगतात, की विमान कोसळल्यानंतर सौंदर्या धावत बाहेर आल्या होत्या. तेव्हा त्यांची साडी पेटली होती. ‘जीव वाचवा’ म्हणून त्या गयावया करत होत्या, पण दुर्दैवाने त्यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. या अपघातात सौंदर्यासह चौघा जणांचा मृत्यू झाला होता. जगाचा निरोप घेताना त्या अवघ्या 31 वर्षांच्या होत्या. पोटात 5 महिन्यांचा जीव वाढवत होत्या.

संबंधित बातम्या :

CDS : जनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आघाडीवर

Rawat Helicopter Crash: आणखी 90 सेकंद असते तर रावत अजूनही देशाची कमान सांभाळत असते, नेमकं काय घडलं दीड मिनिटात?

Rip cds bipin rawat : बिपीन रावतांना अनेक देशातून श्रद्धांजली, रशिया, इस्त्राईल, पाकिस्तान म्हणाला…

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.