Special Story | Happy Birthday Ashutosh Rana | ज्याने सेटवरून हाकललं, त्यानेच पहिला ब्रेक दिला अन् आशुतोष राणांनी पडदा गाजवला!
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आशुतोष राणा (Ashutosh Rana) आज (10 नोव्हेंबर) त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी झाला होता. पडद्यावर कणखर आणि रागीट दिसणारे आशुतोष राणा मनाने अतिशय स्वच्छ आणि सुसंस्कृत व्यक्ती आहेत.
मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आशुतोष राणा (Ashutosh Rana) आज (10 नोव्हेंबर) त्यांचा 53वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी झाला होता. पडद्यावर कणखर आणि रागीट दिसणारे आशुतोष राणा मनाने अतिशय स्वच्छ आणि सुसंस्कृत व्यक्ती आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक त्याच्या अभिनयाचे चाहते बनले आहेत. पण या कलाकारावर एक वेळ अशीही आली होती जेव्हा चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी त्यांना रागाच्या भरात सेटवरून बाहेर काढले होते. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
आशुतोष राणा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1964 रोजी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा या छोट्याशा गावात झाला. आशुतोष राणा यांचे पूर्ण नाव आशुतोष राणा रामनारायण नीखरा आहे. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या निवासस्थानीच पूर्ण केले. लहानपणी ते आपल्या गावात आजूबाजूचे मित्रमंडळी जमवून नाटकांचा खेळ खेळायचे आणि सणांच्या दिवशी आयोजित होणाऱ्या रामलीलेत रावणाची भूमिका साकारायचे.
‘आशुतोष’ ‘राणा’ नावामागे देखील मनोरंजन कथा!
खरंतर ‘राणा’ हे त्यांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे आडनाव नाही, आडनाव फक्त ‘नीखरा’ आहे. मग त्यांचे नाव ‘राणा’ कसे झाले, यामागची कथा त्यांच्या वडिलांच्या नावाशी निगडीत आहे. त्यांच्या वडिलांचे नाव राम नारायण नीखरा आहे, त्यांच्या नावातील दोन अक्षरे म्हणजे रामाचा ‘रा’ आणि नारायणचा ‘ना’ जोडून त्यांनी ‘राणा’ हे नाव बनवले. म्हणजेच ‘नीखरा’जी ‘राणा’जी बनले आणि वडिलांचे आशीर्वादही कायम सोबत राहिले. त्यांच्या ‘आशुतोष’ नावाचीही एक रंजक कथा आहे.
राणा कुटुंब शिवभक्त आहे. एकदा श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जात असताना त्यांची आई महादेवाच्या 1008 नावांवर बेलाची पाने अर्पण करत होती. महादेवाचे नावाचे मंत्र पठण केले जात होते, तेव्हा पंडितजींनी एक ओळ सांगितली, ‘ओम आशुतोषय नमः’, हे नाव ऐकताच डोळे मिटलेल्या मुलाने लगेच डोळे उघडले आणि म्हणाला की, ‘मम्मी हे नाव कसे आहे, हेच मला माझे नाव ठेवायचे आहे.’ सर्वांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि त्यांचे नाव आशुतोष राणा झाले.
आशुतोष राणांचा एनएसडी प्रवेश
अभिनेता आशुतोष राणा हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) 1994 बॅचचे विद्यार्थी आहेत. याबद्दल सांगताना ते म्हणतात की, मी मध्य प्रदेशात राहणारा एक सामान्य विद्यार्थी होतो आणि एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर वकिलीमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता. पण माझ्या गुरूचा आदेश होता की, मी चित्रपटात जावे आणि त्यासाठी मी NSD मधून अभिनयाचे प्रशिक्षण घ्यावे. आशुतोषने सांगितले होते की, प्रशिक्षणानंतर त्याला एनएसडीमध्येच नोकरीची ऑफर देण्यात आली होती आणि तीही भरघोस पगारावर, पण त्याने फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला.
मालिकेतून कारकिर्दीची सुरुवात
आशुतोष राणा यांनी टीव्ही अभिनेता म्हणून ‘स्वाभिमान’ या मालिकेमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘फर्ज’, ‘षड्यंत्र’, ‘कभी कभी’ आणि ‘वारीस’ असे अनेक टीव्ही शो केले. त्यांनी ‘बाजी किसकी’ हा टीव्ही शो देखील होस्ट केला होता. चित्रपट स्टार म्हणून यशस्वी झाल्यानंतर त्यांनी दीर्घ अंतरासह टीव्हीवर पुनरागमन केले आणि ‘काली : एक अग्नि परीक्षा’ या टीव्ही शोमध्ये काम केले. त्यांनी 2004 मध्ये ‘परदेसी रे’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, त्यांना ‘दुष्मन’ चित्रपटातील एका क्रूर खुन्याच्या नकारात्मक भूमिकेतून ओळख मिळाली. आशुतोष राणा यांना ‘दुष्मन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा ‘फिल्मफेअर’ आणि ‘स्क्रीन वीकली’ पुरस्कार मिळाला, तर 2000 साली त्यांना ‘संघर्ष’ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी ‘झी सिने पुरस्कार’ आणि ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला.
ज्याने सेटवरून हाकललं, त्यानेच पहिला ब्रेक दिला!
एका मुलाखतीत आशुतोष राणा यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला होता. आशुतोष यांना चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी भेटण्यास बोलवले होते. आपल्या भारतीय परंपरेनुसार त्यांनी भट्टजींची भेट घेताना त्यांच्या पायाला स्पर्श केला. पण त्यांच्या पायाला हात लावताच भट्ट साहेब रागावले, कारण त्यांच्या पायाला स्पर्श करणाऱ्यांचा त्यांना राग येत असे. आशुतोष यांनी नेमकं तसंच केल्यामुळे रागाने त्यांना सेट बाहेर हाकलण्यात आलं.
आशुतोष म्हणाले, ‘शेवटी महेश भट्ट यांनी मला विचारले आहे की, तू माझ्या पायांना का स्पर्श करतोस, कारण मला असे केलेले अजिबात आवडत नाही.’ यावर आशुतोष म्हणाले की, ‘मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करणे हे माझे संस्कार आहेत, जे मी सोडू शकत नाही.’ हे ऐकून महेश भट्ट यांनी आशुतोष राणा यांना मिठी मारली आणि त्यांना ‘स्वाभिमान’ या टीव्ही मालिकेत पहिली भूमिका दिली, ज्यामध्ये त्यांची भूमिका गुंडाची होती. त्यानंतर आशुतोष यांनी महेश भट्ट यांच्यासोबत ‘जख्म’, ‘दुश्मन’ या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
रेणुका शहाणेंशी बांधली लग्नगाठ!
आशुतोष राणा यांनी अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी लग्न केले आहे. रेणुका आणि आशुतोष यांची पहिली भेट ‘जयती’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर अनेक महिने दोघांमध्ये बोलणे देखील झाले नव्हते. ऑक्टोबर 1998 मध्ये आशुतोष यांनी रेणुका यांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन-तीन दिवस त्यांनी रेणुका शहाणेंना सतत फोन केला. त्यानंतर दोघेही तीन महिने फोनवर बोलत राहिले. रेणुकाचे एक लग्न आधीच तुटले होते. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत.