Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishna Trailer | आमिर खान बनणार ‘कृष्णा’, तर दीपिका पदुकोण साकारणार ‘राधा’, पाहा ‘कृष्णा’चा जबरदस्त ट्रेलर

‘बाहुबली’ नंतर ब्लॉकबस्टर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या ‘आरआरआर’ आणि 'कृष्णा' या चित्रपटांची घोषणा केली. सध्या सर्वत्र ‘आरआरआर’ची चर्चा सुरु आहे. मात्र, नुकतेच एक मोठे सरप्राईज प्रेक्षकांना मिळाले आहे. राजामौली यांच्या ‘कृष्णा’ या आगामी भव्य चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Krishna Trailer | आमिर खान बनणार ‘कृष्णा’, तर दीपिका पदुकोण साकारणार ‘राधा’, पाहा ‘कृष्णा’चा जबरदस्त ट्रेलर
Krishna
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 12:36 PM

मुंबई : ‘बाहुबली’ नंतर ब्लॉकबस्टर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी त्यांच्या ‘आरआरआर’ आणि ‘कृष्णा’ या चित्रपटांची घोषणा केली. सध्या सर्वत्र ‘आरआरआर’ची चर्चा सुरु आहे. मात्र, नुकतेच एक मोठे सरप्राईज प्रेक्षकांना मिळाले आहे. राजामौली यांच्या ‘कृष्णा’ या आगामी भव्य चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘कृष्णा’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘कृष्णा’ आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘राधा’ साकारणार आहे. या भव्य चित्रपटाची छोटीशी झलक या ट्रेलरमध्ये दिसत आहे. या ट्रेलरमधून आमिर खान आणि दीपिका पदुकोण नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाहीर झाले आहे. मात्र, अद्याप त्यांचे लूक रिव्हील करण्यात आलेले नाहीत.

पाहा ट्रेलर :

ट्रेलरमध्ये ‘महाभारता’च्या कुरुक्षेत्राची झलक पाहायला मिळत आहे. भव्य सेट आणि संगीत यात पाहायला मिळत आहे. मात्र, आता आमिर आणि दीपिकाचा लूक कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमिर ‘लाल सिह चढ्डा’मध्ये व्यस्त!

आमिर खानच्या (Amir Khan) लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. अहवालांनुसार, हा चित्रपट नाताळच्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता चाहत्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार रिलीज

आमिर खान प्रॉडक्शन आणि वायाकॉम 18 स्टुडिओने त्यांच्या बहुप्रतिक्षित लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची नवीन रिलीज डेट अधिकृतपणे जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चित्रपटाच्या नवीन रिलीजच्या तारखेची घोषणा करताना आमिर खान प्रॉडक्शन म्हणाले की, “22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कोरोनामुळे होणाऱ्या विलंबामुळे आमचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट या ख्रिसमसला प्रदर्शित होणार नाही. आता आम्ही लालसिंग चड्ढा व्हॅलेंटाईन डे, 2022 ला रिलीज करू. ”

काय आहे कथा?

लाल सिंह चड्ढामध्ये आमिर आणि करीना कपूर खान यांना पुन्हा एकत्र दिसतील, या दोघांनी शेवटच्या वेळी ‘3 इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आमिर आणि करीनासोबत नागा चैतन्य, मोना सिंग आणि मानव व्हीजे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाद्वारे साऊथचा स्टार नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. नागाने आमिर खानसोबत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ वर लक्ष केंद्रित करणारा सुपरस्टार पोस्ट-प्रोडक्शनच्या तीव्र टप्प्यात आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ हे हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पचे रूपांतर आहे. टॉम हँक या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले. आतापर्यंत देशातील 100 ठिकाणी याचे चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचा मोठा भाग पंजाब आणि लडाखमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Salman Khan:”सलमान खानसारख्या अभिनेत्यांनी मुस्लिमांना लसीकरणसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे”- महापौर किशोरी पेडणेकर

Kangana Ranaut Controversy | दुसरा गाल दिल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही!, कंगना रनौत पुन्हा बरळली!

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.