सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पुन्हा ठोठावले दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे, ‘न्याय’ चित्रपटाविरोधात केले अपील

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे वडील किशोर कृष्णा सिंह (KK Singh) यांनी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा वाद ‘न्याय: द जस्टिस’ (Nyay : The Justice) या चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यासारखी कहाणी दाखवली जात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पुन्हा ठोठावले दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे, ‘न्याय’ चित्रपटाविरोधात केले अपील
सुशांत सिंह राजपूत
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 1:08 PM

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचे वडील किशोर कृष्णा सिंह (KK Singh) यांनी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा वाद ‘न्याय: द जस्टिस’ (Nyay : The Justice) या चित्रपटाचा आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यासारखी कहाणी दाखवली जात आहे. तथापि, दोन आठवड्यांपूर्वी हायकोर्टाने त्याच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. तसेच, त्यामध्ये सुशांतचे नाव आणि त्याच्याशी मिळतीजुळती कथा न दाखवण्याचे त्यांनी अपील केले होते (Sushant Singh Rajput father KK singh appeals against Nyay The Justice film in delhi high court).

सुशांतच्या नावाचा आणि त्याच्या प्रसिद्धीचा गैरवापर होऊ नये, यासाठी हायकोर्टाने पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी केके सिंह यांनी केली असून, या प्रकरणात आज (23 जून) कोर्टात सुनावणी होणार आहे.

‘न्याय : द जस्टिस’ची कथा

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याची पहिली जयंती होती. यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ‘न्याय : द जस्टिस’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्यानंतर त्याच्या मृत्यूच्या चौकशीत नेमकी त्याच घटनेचे वर्णन केले आहे. हा ट्रेलर पाहिल्याबरोबर सुशांतच्या चाहत्यांना प्रचंड राग आला. कारण, सुशांतने आत्महत्या केली आहे यावर फॅन्स विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. सुशांतच्या मृत्यूचे सत्य सर्वांसमोर आले पाहिजे, असा ते गेल्या एक वर्षापासून म्हणत आहेत.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेत त्यांनी सुशांतच्या आयुष्यावर आधारित विविध प्रस्तावित प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या याचिकेत सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी आपल्या मुलाचे नाव किंवा तत्सम पात्र असणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट

यासोबतच सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी किंवा प्रस्तावित प्रकल्पांचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता. ज्यात “सुसाईड ओर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट”, ‘शशांक’ आणि एका निनावी चित्रपटाचा उल्लेख होता. अशा परिस्थितीत सुशांतच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असेही यात म्हटले होते.

(Sushant Singh Rajput father KK singh appeals against Nyay The Justice film in delhi high court)

हेही वाचा :

International Widow Day | ‘या’ बॉलिवूड चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर दाखवली विधवांची व्यथा, अभिनेत्रींनीही केला सशक्त अभिनय!

Photo : अनुरागची लेक आलियापासून ते अमिताभ यांची नात नव्यापर्यंत, ‘हे’ स्टारकिड्स इंडस्ट्रीपासून लांब तरीही चर्चेत!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.