इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर तापसीचे ट्वीट म्हणाली, आता मी स्वस्त राहिले नाहीये
आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्या आहे. इन्कम टॅक्स विभागाने अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत.
मुंबई : आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्या आहे. इन्कम टॅक्स विभागाने अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu), दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकल्या आहेत. (Taapsee Pannu’s first reaction tweet after the income tax raid)
अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, आता या सर्व प्रकरणानंतर तापसी पन्नूने दोन ट्वीट केले आहेत. तापसीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटंले आहे की, 3 दिवसांच्या शोधात फक्त तीन गोष्टींचा समावेश आहे. 1 पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला कथित बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. 2 मी याआधीच नाकारलेल्या 5 कोटी रकमेची “कथित” पावती.
तापसी पन्नूने केलेले ट्वीट
3 days of intense search of 3 things primarily 1. The keys of the “alleged” bungalow that I apparently own in Paris. Because summer holidays are around the corner
— taapsee pannu (@taapsee) March 6, 2021
3 सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2013 मधील माझ्यावर टाकलेल्या छापेची आठवण शेवटी तापसीने लिहिले की, आता एवढे स्वस्त नाही. आता तापसीच्या या ट्वीटमुळे परत एकदा वातावरण तापलेले दिसत आहे. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याची निगडित असलेल्या एकूण 28 मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाला त्यांच्या आर्थिक व्यवहरात काही विसंगती आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे सर्च ऑपरेशन केलं. अनुराग आणि तापसीचं घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले. इनकम टॅक्स विभागाला 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरीची शंका आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत असे सांगितले जात आहे.
संबंधित बातम्या :
रिया चक्रवर्तीने सुशांतला ड्रग्ज दिले, एनसीबीच्या चार्जशीटमध्ये आरोप; रियाच्या अडचणीत वाढ
Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर
(Taapsee Pannu’s first reaction tweet after the income tax raid)