Salman Khan | या अभिनेत्याने केला मोठा दावा, चित्रपट फ्लॉप होण्याच्या भीतीने सलमान खान खरेदी करणार 100 कोटींची तिकिटे

सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. सिध्दार्थ शुक्ला याचे चाहते शहनाज गिल हिला सपोर्ट करताना दिसतात.

Salman Khan | या अभिनेत्याने केला मोठा दावा, चित्रपट फ्लॉप होण्याच्या भीतीने सलमान खान खरेदी करणार 100 कोटींची तिकिटे
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:09 PM

मुंबई : सलमान खान याच्या आगामी किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून बिग बाॅस फेम शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान (Salman Khan) याने या चित्रपटात शहनाज गिल हिला संधी दिलीये. सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाल्यानंतर शहनाज गिल हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. सिध्दार्थ शुक्ला याचे चाहते शहनाज गिल हिला सपोर्ट करताना दिसतात. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील गाणेही रिलीज करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहे. आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्याही चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. बाॅलिवूडच्या चित्रपटांवर सतत सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्याची मागणी ही केली जाते. यामुळे बाॅलिवूडच्या चित्रपटांना फटका बसत असल्याचे सांगण्यात येतंय.

शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाला रिलीज होऊन 32 दिवस झाले असतानाही या चित्रपटाची जादू बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती, परंतू याचा प्रत्यक्षात चित्रपटाला काही तोटा झाला नाही.

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान हा चित्रपट यंदा 2023 मध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सलमान खान आणि चित्रपटाची टिम सतत हा चित्रपट फ्लाॅप जाऊ नये. यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांसह निर्मात्यांनी मोठ्या अपेक्षा आहेत.

आता एका अभिनेत्याने सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाबद्दल मोठा दावा केला आहे. केआरकेने एक ट्विट करत म्हटले आहे की, चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवण्यासाठी अभिनेता 100 कोटींची तिकिटे खरेदी करणार आहे. जरी केआरके याने सलमान खान याचे नाव किंवा किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे नाव घेतले नसले तरीही त्याचा निशाणा कोणावर आहे, हे सर्वांना कळाले.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुढऊ यांनी त्यांच्या ‘किसी का हाथ किसी की तंग’ या चित्रपटासाठी 100 कोटी रुपयांची तिकिटे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता या चित्रपटाचा लाइफटाईम बिझनेस 150 कोटींचा असेल. 50 कोटी रिअल आणि 100 कोटी थिएटरमधून फीडिंग लावून

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.