साजिद खान याच्यावर या अभिनेत्रीने केला ‘मीटू’चा आरोप, म्हणाली 10 वर्षांपूर्वी…
सुरूवातीला अनेक अभिनेत्रींनी साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात बघितल्यावर संताप व्यक्त केला.
मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये सहभागी झालेल्या साजिद खान याच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरामध्ये साजिद खान चांगला गेम खेळत असतानाच बाहेर साजिद विरोधात एक मोहिमच सुरू झालीये. सुरूवातीला अनेक अभिनेत्रींनी साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात बघितल्यावर संताप व्यक्त केला. मात्र, दुसरीकडे साजिद खान याला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. साजिद आणि अब्दुची जोडी अनेकांना आवडली देखील आहे. साजिद खान याच्यावर अजून एका अभिनेत्रीने मीटूचा आरोप केला आहे.
मॉडल आणि अभिनेत्री रैय्या लबीब हिने आता साजिद खान याच्यावर आरोप केले आहेत. रैय्या लबीब हिने 10 वर्षांपूर्वी घडलेला किस्सा सांगितला आहे. ती साजिद खान याला दहा वर्षांपूर्वी भेटली होती.
आता बिग बाॅसच्या घरात तिने साजिद खान याला बघितले आणि तिला तो घडलेला सर्व प्रकार आठवला. करिअरची सुरूवात असल्याने रैय्या लबीब हिने साजिद खान याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते.
रैय्या लबीब म्हणाली की, मुंबईमध्ये एका मोठ्या हाॅटेलमध्ये एक पार्टीमध्ये मी साजिद खान याला भेटले होते. यावेळी साजिद खान याने तिच्या स्तनांबद्दल भाष्य केले होते. इतकेच नाहीतर तिला आठवड्यामधून सेक्स किती वेळ करते हे देखील विचारले होते.
हे सर्व प्रश्न साजिद खान हा तिला परत परत विचारत असल्याचे तिने म्हटले आहे. पुढे रैय्या लबीब म्हणाली की, मी साजिद खानच्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. कारण मी मुंबईमध्ये नवीन होते आणि माझा संघर्ष सुरू होता.
इतकेच नाहीतर या सर्व गोष्टी मला ऐकण्याची सवय झाली होती. अनेकांनी माझ्या स्तनांबद्दल त्यापूर्वीही कमेंट केल्या होत्या. यामुळे मला हे सर्व ऐकण्याची एकप्रकारे सवयच झाली होती.