अभिनेता विवेक ऑबेरॉयची पत्नी आहे या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी, रंजक आहे प्रेमकथा

अभिनेता विवेक ऑबेरॉयचा विवाह २०१० मध्ये झाला होता. पण तो ऐश्वर्या सोबत रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. पण पत्रकार परिषद घेत सलमानवर केलेल्या आरोपांवर त्यांचं नातं तुटलं होतं. नंतर विवेकने प्रियांका सोबत विवाह करण्याचा निर्णय़ घेतला होता. प्रसिद्धीपासून लांब राहणारी प्रियांका अल्वा कोण आहे जाणून घ्या.

अभिनेता विवेक ऑबेरॉयची पत्नी आहे या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी, रंजक आहे प्रेमकथा
vivek oberoy wife
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 6:05 PM

अभिनेता विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. विवेकने 2002 मध्ये ‘कंपनी’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. त्याच्या सुंदर लूकमुळे त्याने लाखो मुलींची मने जिंकली होती. विवेक हा तेव्हा त्याच्या लूकमुळे मुलींमध्ये लोकप्रिय होता. पण सलमान खानसोबतच्या भांडणामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले होते. ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या वाढत्या नात्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली होती, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीने त्याला बाजूला केले होते. इतकंच नाही तर ऐश्वर्याने एका मीडिया मुलाखतीत विवेक ओबेरॉयशी संबंध नाकारले होते. तेव्हा विवेक ओबेरॉय खूप दुखावला गेला होता. त्यानंतर विवेकने प्रियांका सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

2010 मध्ये दोघांचा विवाह

प्रियांका अल्वा आणि विवेक ऑबेरॉय यांचा विवाह ऑक्टोबर 2010 मध्ये झाला. पण प्रियांका ही नेहमीच मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर राहिली. पण असं असलं तरी ती एका प्रतिष्ठीत घरातली मुलगी आहे. विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा ही दिवंगत राजकारणी जीवराज अल्वा यांची मुलगी आहे.

प्रियांका अल्वा हिचे वडील कर्नाटकचे राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. 2001 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. प्रियांकाची आई नंदिनी अल्वा या गृहिणी आहेत. प्रियांका अल्वाचा जन्म 1983 मध्ये दिल्लीत झाला होता. जेव्हा ते फ्लोरेन्समधील एका कॅफेमध्ये पहिल्यांदा एकमेकांना भेटले तेव्हा त्यांची प्रेमकथा पुढे सुरु झाली.

प्रियांका आणि विवेकची प्रेमकथा

प्रियांका आणि विवेकच्या यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. विवेक आपल्या मैत्रिणीशी फिल्मी हिरोप्रमाणे बोलत असताना भारताला जाणारी त्याची फ्लाइट चुकली. त्यानंतर पहिल्या भेटीत प्रियांका अल्वाने तिच्या साधेपणाने विवेकचे मन जिंकले होते. अभिनेत्याने प्रियांकाला सांगितले होते की, तो एक अभिनेता आहे आणि ती त्याच्याबद्दल Google करू शकते, परंतु प्रियांकाने सुंदरपणे उत्तर दिले की तिला गुगलवर फक्त त्याच्या कामाविषयी माहिी मिळेल इतर नाही. तिला विवेक बद्दल आणखी काही जाणून घ्यायचे होते.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

विवेक ओबेरॉयला प्रेमाची भीती वाटत होती कारण त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. पण नंतर त्याच्या आईनेच त्याला प्रियांकाला भेटायला पटवले आणि अखेरीस त्यांनी एकमेकांशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. सध्या प्रियांका आणि विवेक त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....