एक कोटीचा आकडा पार करणेही राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटाला अवघड, पठाण चित्रपटाचा बसला मोठा फटका

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा धमाका सुरू असल्याने गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाला मोठा फटका बसलाय. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

एक कोटीचा आकडा पार करणेही राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटाला अवघड, पठाण चित्रपटाचा बसला मोठा फटका
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 8:04 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने ओपनिंग डेला मोठा धमाका केला आणि अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादामध्ये अडकला होता. २६ जानेवारी रोजी बाॅलिवूडमधील दुसरा बहुचर्चित चित्रपट गांधी गोडसे: एक युद्ध (Gandhi Godse Ek Yudh)देखील रिलीज झालाय. हा चित्रपट रिलीजच्या अगोदर मोठ्या वादात अडकला होता. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतू शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा धमाका सुरू असल्याने गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाला मोठा फटका बसलाय. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. रिलीजच्या अगोदर या चित्रपटामुळे मोठे वादळ आले होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामुळे गांधी गोडसे या चित्रपटाची चर्चा देखील होत नाहीये. काही दिवसांपूर्वीच गांधी गोडसे: एक युद्ध चित्रपटाच्या निर्मात्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी केले आहे. अनेक वर्षांनंतर त्यांनी चित्रपटाची निर्मिती करत पुनरागमन केले आहे. या चित्रपटाकडून त्यांना खूप जास्त अपेक्षा होत्या. परंतू पठाण चित्रपटाचा फटका त्यांच्या चित्रपटाला बसला.

रिपोर्टनुसार गांधी गोडसे: एक युद्ध हा चित्रपट तयार करण्यास 45 कोटीचे बजेट होते. मात्र, चित्रपटाची ओपनिंग फारच निराशाजनक राहिली. गांधी गोडसे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 80 लाखांची कमाई बाॅक्स आॅफिसवर केली. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.

गांधी गोडसे: एक युद्ध चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३४ लाखाची कमाई केली. मुळात म्हणजे गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. परंतू पठाण चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ असल्याने प्रेक्षकांनी पठाण चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिला.

दुसरीकडे पठाण या चित्रपटाने तीन दिवसांमध्येच जवळपास ३०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन जगभरातून केले आहे. मात्र, गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटाला १ कोटीचा आकडा पार करणे देखील अवघड झाले आहे. मात्र, शनिवार आणि रविवारमध्ये चित्रपटाची कमाई वाढू शकते, असा अंदाज बांधला जातोय.

गांधी गोडसे: एक युद्ध या चित्रपटामध्ये अभिनेता दीपक अंतानी हा गांधींच्या भूमिकेत आहे. चिन्मय मांडलेकर हा गोडसेच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटावर टीका केली जात होती.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.