The Kashmir Files: बजेट कमी, मोजकं प्रमोशन करूनही ‘द काश्मीर फाईल्स’ची दणक्यात कमाई

चित्रपटाचा बजेट, प्रमोशनवर केलेला खर्च या गोष्टींवर बॉक्स ऑफिसची कमाई अवलंबून असते, असं अनेकांचं म्हणणं असतं. मात्र या गोष्टी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स'ने (The Kashmir Files)साफ खोट्या ठरवल्या आहेत.

The Kashmir Files: बजेट कमी, मोजकं प्रमोशन करूनही 'द काश्मीर फाईल्स'ची दणक्यात कमाई
The Kashmir FilesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:57 AM

चित्रपटाचा बजेट, प्रमोशनवर केलेला खर्च या गोष्टींवर बॉक्स ऑफिसची कमाई अवलंबून असते, असं अनेकांचं म्हणणं असतं. मात्र या गोष्टी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ने (The Kashmir Files)साफ खोट्या ठरवल्या आहेत. कमी बजेट, मोजकं प्रमोशन आणि मार्केटिंग, निवडक शो, चित्रपटावरून झालेला वाद हे सर्व असूनसुद्धा ‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनुपम खेर (Anupam Kher), दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट IMDb रेटिंग्जमध्येही अव्वल ठरला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ने शुक्रवारी 3.55 कोटी रुपये, शनिवारी 8.50 कोटी रुपये आणि रविवारी 15.10 कोटी रुपये कमावले. या तीन दिवसांत चित्रपटाने 27.15 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारच्या कमाईत तब्बल 325.35 टक्क्यांनी वाढ झाली. देशातील निवडक थिएटर्समध्येच हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा केलेली कमाई ही खूपच सकारात्मक असल्याचं मत चित्रपट व्यापार विश्लेषकांनी नोंदवलं आहे.

मर्यादित प्रमोशन, कुठलाही हॉलिडे नाही, ‘राधे श्याम’सारख्या बिग बजेट चित्रपटाची टक्कर, जवळपास फक्त 630 स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊनसुद्धा ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये खेचलं आहे, असं तरण आदर्श म्हणाला. या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या शोजसाठीही अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. विस्थापितांचं दु:ख मांडणाऱ्या या चित्रपटाने IMDb रेटिंग्जमध्ये मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. IMDb वर 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळणं सोपं नसतं. एखादा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला असेल तरच त्याला चांगली रेटिंग मिळते. ‘द काश्मीर फाईल्स’ला मिळालेली 10/10 IMDb रेटिंग्ज ही प्रेक्षकांकडून मोठी पोचपावती आहे, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा:

‘इंडियन आयडॉल 12’ फेम पवनदीप-अरुणिता कायद्याच्या कचाट्यात; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.