The Kashmir Filesची आठवडाभराची कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभागी

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

The Kashmir Filesची आठवडाभराची कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभागी
The Kashmir FilesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 12:21 PM

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, धुलिवंदनच्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये (100 crore club) सहभागी होणार आहे. 100 कोटींसाठी फक्त 2.7 कोटी रुपयांची गरज आहे. प्रदर्शनानंतरचा पहिला आठवडा हा प्रत्येक चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असतो. याच पहिल्या आठवड्यात ‘द काश्मीर फाईल्स’ने प्रेक्षक-समीक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांचाही त्यावर परिणाम झाला नाही.

‘द काश्मीर फाईल्स’ने बॉक्स ऑफिस कमाईचा नवा विक्रम रचला आहे. पहिल्या दिवशी फक्त 3.55 कोटी रुपयांची कमाई केलेल्या या चित्रपटाने सात दिवसांत 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. हा नवीन बेंचमार्क असल्याचं तरण आदर्शने म्हटलंय. बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमने वर्तवलेल्या अंदाजानुसार, द काश्मीर फाइल्सची स्पर्धा ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’ आणि ‘दंगल’ या चित्रपटांशी होत आहे. कारण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या दोन चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. हा चित्रपट आता बाहुबली 2: द कन्क्लूजनच्या आठव्या दिवसाचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करत आहे. अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत बाहुबली 2: द कन्क्लूजनला आव्हान देणारा दुसरा कोणताही चित्रपट आलेला नाही.

द काश्मीर फाईल्सची कमाई- शुक्रवार- 3.55 कोटी रुपये शनिवार- 8.50 कोटी रुपये रविवार- 15.10 कोटी रुपये सोमवार- 15.05 कोटी रुपये मंगळवार- 18 कोटी रुपये बुधवार- 19.05 कोटी रुपये गुरुवार- 18.05 कोटी रुपये एकूण- 97.30 कोटी रुपये

हेही वाचा:

डोक्यात कढई, छातीला डबे, कमरेला किसणी Rakhi Sawant चा विचित्र डान्स, सोशल मीडियावर धुमाकूळ!

साऊथचा श्रीवल्ली विसरा,मराठीतली ‘पुष्पावल्ली’ पाहा…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.