Sidharth Kiara Wedding | सिद्धार्थ-कियारा याच्या लग्नाला शाहिद कपूरपासून ते करण जोहरपर्यंत हे बाॅलिवूड स्टार लावणार हजेरी, वाचा यादी

अत्यंत खासगी पध्दतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधणात अडकणार आहेत.

Sidharth Kiara Wedding | सिद्धार्थ-कियारा याच्या लग्नाला शाहिद कपूरपासून ते करण जोहरपर्यंत हे बाॅलिवूड स्टार लावणार हजेरी, वाचा यादी
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 4:59 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी तो दिवस जवळ आलाय. सिद्धार्थ आणि कियारा हे उद्या म्हणजेच ६ फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात झालीये. अगोदर मेहंदी, हळद आणि रात्री संगीत प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाह सोहळा हा पार पडणार आहे. कालच कियारा अडवाणी ही मुंबईहून जैसलमेरकडे रवाना झाली आणि सिद्धार्थ मल्होत्रा हा दिल्लीहून आपल्या कुटुंबियांसोबत जैसलमेरला पोहचला. अत्यंत खासगी पध्दतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्नबंधणात अडकणार आहेत.

पाहुण्यांसाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये तब्बल ८० रूम या बुक करण्यात आल्या आहेत. लग्नामध्ये पाहुण्यांना देखील काही नियम फाॅलो करावे लागणार आहेत. लग्नामध्ये नो फोन पाॅलिसी असल्याने पाहुण्यांना आपले फोन जमा करावे लागतील.

विशेष म्हणजे कोणालाही या लग्नातील फोटो किंवा व्हिडीओ हे शेअर करता येणार नाहीत. चाहते कियाराच्या मेहंदीच्या फोटोंची वाट पाहात आहेत .मात्र, अजूनही कियारा किंवा सिद्धार्थ यांनी कोणतेही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले नाहीयेत.

अगदी १०० ते १५० लोकांच्या उपस्थितीमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. करण जौहर, आरती शेट्टी, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर, शबीना खान हे लग्न सोहळ्यास उपस्थिती लागणार आहेत.

करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे खास नाते असून स्टूडेंट ऑफ द ईअर या चित्रपटामधून करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा याला हिरो बनण्याची संधी दिली होती. कबीर सिंह या चित्रपटामध्ये पहिल्यांदा कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोबत काम केले.

अंबानी परिवार देखील सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. ईशा अंबानी आणि कियारा या लहानपणीपासूनच्या मैत्रीनी आहेत. जैसलमेर विमानतळावर अंबानी कुटुंबियांना स्पाॅट केले गेले आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.