Shah Rukh Khan | या पाकिस्तानी कलाकाराने दिले शाहरुख खान याला मोठे गिफ्ट, अभिनेत्याचे सर्वात मोठे…

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. शाहरुख खान याच्या या चित्रपटाने धमाका केलाय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले असून शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाारा हा चित्रपट ठरलाय.

Shah Rukh Khan | या पाकिस्तानी कलाकाराने दिले शाहरुख खान याला मोठे गिफ्ट, अभिनेत्याचे सर्वात मोठे...
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:54 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका केला. विशेष म्हणजे पठाण हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) ठरलाय. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, या वादाचा प्रत्यक्षात चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसत आहे. कारण शाहरुख खान याच्या चित्रपटाने थेट बाहुबली या चित्रपटाचा रेकाॅर्डही तोडलाय. पठाण हा सर्वाधिक कमाई करणारा बाॅलिवूड (Bollywood) चित्रपट ठरलाय.

विशेष बाब म्हणजे शाहरुख खान हा पठाण चित्रपटाचे काही खास प्रमोशन करतानाही दिसला नाही. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान हा चाहत्यांसाठी सेशनचे आयोजन करत होता. पठाण चित्रपटाला रिलीजच्या अगोदर मोठा विरोध होताना दिसला. मात्र, यावर कधीच शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टिमने काही भाष्य केले नाही.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने फक्त भारतामध्येच नाहीतर विदेशातही तूफान अशी कामगिरी केलीये. ओपनिंग डेला जगभरातून पठाण चित्रपटाने तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पाकिस्तानमध्येही शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय, त्यामुळे शाहरुख खान हा चर्चेत आलाय.

पाकिस्तानमधील सँड आर्टिस्ट समीर शौकत हा शाहरुख खान याचा मोठा चाहता आहे. नुकताच समीर शौकत याने बलुचिस्तानमधील प्रसिद्ध गडानी बीचवर शाहरुख खान याचे स्केच वाळूने काढले आहे. या वाळूच्या स्केच खाली समीर शौकत याने SRK देखील लिहिले आहे. आता हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. समीर शौकत हा शाहरुख खान याचा मोठा आणि जबर फॅन आहे.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याच्यासाठी हे वर्ष अत्यंत लकी ठरल्याचे दिसते आहे. कारण शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही देखील याचवर्षी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. दुसरीकडे शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता शाहरुख खान हा जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.