Accusation | या मराठी अभिनेत्रीने साजिद खान याच्यावर केले अत्यंत गंभीर आरोप

या अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नेमके काय घडले होते हे देखील सांगितले आहे.

Accusation | या मराठी अभिनेत्रीने साजिद खान याच्यावर केले अत्यंत गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 6:29 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मध्ये साजिद खान दाखल झाल्यापासून बाहेर मोठा वाद सुरू आहे. शर्लिन चोप्रा हिने साजिद खान विरोधात मोहिमच सुरू केलीये. साजिद खान याला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्याची मागणी तिने केली. साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात पाहिल्यानंतर अनेक अभिनेत्री पुढे आल्या आणि साजिद खान याच्यावर MeTooचे आरोप केले. नुकताच एका मराठी अभिनेत्रीने देखील साजिद खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नेमके काय घडले होते हे देखील सांगितले आहे.

साजिद खान हा बिग बाॅसच्या घरात चांगला गेम खेळत आहे. इतकेच नाहीतर चाहते देखील साजिद खान याला प्रेम देत आहेत. मात्र, साजिद खान बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यानंतर बाहेर मोठा वाद सुरू आहे.

अभिनेत्री जयश्री गायकवाड हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत साजिद खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयश्री गायकवाड हिने आठ वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे.

जयश्री गायकवाड म्हणाली की, मी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होते. यावेळी एका पार्टीमध्ये माझी आणि साजिद खान याची भेट झाली. यावेळी साजिद खान म्हणाला की, मी एका चित्रपटावर काम करतोय.

या चित्रपटामध्ये तुला काम मिळू शकते. तू उद्या मला भेटण्यासाठी माझ्या आॅफिसला ये…जयश्री म्हणाली त्यानंतर मी खूप जास्त खुश झाले आणि मी दुसऱ्या दिवशी साजिद खान याच्या आॅफिसला गेले.

साजिद खानच्या आॅफिसमध्ये तो एकटाच होता. बोलताना तो माझ्या शरीराला सतत हात लावत होता. तो म्हणाला की, मी तुला चित्रपटामध्ये का काम देऊ? यावर मी म्हणाले की मी चांगला अभिनय करते.

साजिद खान म्हणाला, फक्त अभिनय चांगला करून काहीच होत नाही. तुला माझे सर्व ऐकावे लागेल. मी जसे म्हटले तसेच तुला वागावे लागले…हे सर्व ऐकून मला त्याचा जागीच जीव घेण्याची इच्छा झाली होती. मी तिथून रागात निघून आले, असे जयश्री गायकवाड म्हणाली.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.