Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Engagement | प्रभास आणि क्रिती सनॉन यांचा साखरपुडा या महिन्यात? या व्यक्तीने दिली मोठी हिंट

आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरून यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. आता थेट प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या साखरपुड्याची एक बातमी पुढे येतंय.

Engagement | प्रभास आणि क्रिती सनॉन यांचा साखरपुडा या महिन्यात? या व्यक्तीने दिली मोठी हिंट
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 4:27 PM

मुंबई : अभिनेता प्रभास आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून क्रिती आणि प्रभास हे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांना देखील क्रिती आणि प्रभास यांची जोडी प्रचंड आवडलीये. चाहते आता थेट यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. बाॅलिवूड (Bollywood) स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न झाले आणि आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे देखील आजच लग्नबंधणात अडकणार आहेत. आता चाहत्यांना प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. जरी प्रभास आणि क्रिती यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असल्या तरीही या दोघांपैकी कोणीच आपले नात सर्वांसमोर स्वीकारले नाहीये. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरून यांच्या लव्ह स्टोरीला (Love story) सुरूवात झाल्याचे सांगितले जाते. आता थेट प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या साखरपुड्याची एक बातमी पुढे येतंय.

विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी प्रभास आणि क्रितीच्या साखरपुड्याबाबत एक ट्विट केले आहे. हे ट्विट बघितल्यानंतर प्रभास आणि क्रितीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. या ट्विटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

या ट्विटमध्ये लिहिण्यात आले आहे की, प्रभास आणि क्रिती सनॉन यांचा साखरपुडा हा पुढच्या महिन्यात मालदीवमध्ये पार पडणार आहे. मात्र, या ट्विटमध्ये किती सत्य आहे हे सांगणे अवघड आहे. मात्र, या ट्विटनंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Prabhas

वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांचा भेडिया हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाचे प्रमोशन वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांनी केले होते. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला नाहीये. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती.

चित्रपटाच्या प्रमोशन वेळी एका शोमध्ये वरुण धवन याने म्हटले होते की, क्रितीचा दिल ज्याच्याकडे आहे तो सध्या मुंबईच्या बाहेर आहे. विशेष म्हणजे तो सध्या दीपिका पादुकोण हिच्यासोबत शूटिंग करतोय, असे वरुण धवन याने म्हटले होते.

विशेष बाब म्हणजे खरोखरच त्यावेळी प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्या आगामी एका चित्रपटाचे शूटिंग मुंबई बाहेर सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून सतत प्रभास आणि क्रितीच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघेही आपल्या रिलेशनवर काहीच भाष्य करत नाहीयेत.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.